नवीन लेखन...

एव्हरग्रीन चंद्रशेखर

मी देव आनंदचा जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पहात मोठा झालो. त्याचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासून सप्तरंगी चित्रपटही पाहिले, साठवणीतल्या आठवणीत ते जपून ठेवले.
देव आनंदला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती, तीदेखील पूर्ण झाली. त्याची स्वाक्षरी घेतली. ‘गाईड’ चित्रपट अनेकदा पाहिला. त्याचा नवीन आलेल्या चित्रपटाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ कधीही चुकवला नाही.
३ डिसेंबर २०११ साली देव आनंद हे जग सोडून गेले. ‘आनंद’ चित्रपटातील संवादाप्रमाणे म्हणता येईल, आनंद असो वा देव आनंद, ‘आनंद’ कभी मरते नहीं, वो आज भी हैं….
माझा एक जिवलग मित्र आहे, चंद्रशेखर महामुनी! त्याच्या रुपाने देव आनंद आजही आपल्यात आहे… देव आनंदचा प्रभाव असलेली माणसं मी अनेक पाहिली. सदाशिव पेठेत एक तरुण आपल्या पॅन्टच्या खिशातून रुमाल बाहेर काढून फिरताना मी पाहिलेला आहे. देव आनंद प्रमाणेच गळ्याला मफलर गुंडाळून हिरोगिरी करणारेही पाहिले आहेत. मात्र नखशिखांत देव आनंदच दिसणारा, बोलणारा, वागणारा एकमेव मित्र… चंद्रशेखरच!!!
२५ सप्टेंबर २००० रोजी त्यानं त्याच्या ‘निषाद’ बॅनरखाली ‘गाता रहे मेरा दिल’ हा देव आनंदच्या चित्रपटातील गीतांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यासाठी देव आनंदचे आमच्या संग्रहातील काही फोटो घेण्यासाठी चंद्रशेखर आमच्याकडे आला होता. आम्हां तिघांचाही आदर्श एकच असल्याने ‘देव’ विषयावर खूप गप्पा झाल्या.
देव आनंदचा आवडता रंग हा लाल होता, तशाच लाल रंगाचा शर्ट काॅलरच्या बटणासहीत लावलेला चंद्रशेखर, देव आनंदच्या केसांच्या कोंबड्यासारखाच भांग पाडून समोर येतो तेव्हा तो साक्षात ‘देव’च भासतो!
तो बोलतोही देवसारखंच. देव आनंदच्या चित्रपटातील सर्व गाण्यांवर त्याची हुकूमत आहे. किशोरकुमारसारखाच आवाज त्यानं मेहनत घेऊन प्राप्त केलेला आहे.
चंद्रशेखर देव आनंदला अनेकदा प्रत्यक्ष भेटलेला आहे. त्या भेटीत देव आनंद देखील खूश झाले असतील की, माझ्या नंतरही माझी प्रतिमा जपणारे, चालविणारे उत्साही कलाकार अस्तित्वात आहेत…
घरात लहानपणापासूनच सूर, ताल, संगीताचं वातावरण असल्यामुळे त्याविषयी चंद्रशेखरला आवड निर्माण झाली. १९८६ ला दहावीची परीक्षा दिल्यानंतर या संगीत क्षेत्राची वाटचाल त्यानं सुरू केली. सुरुवातीला कोरसमध्ये गाण्याची संधी मिळाली. पुढे सहगायक म्हणून काम केले. अनुभव घेत घेत आजवरचा यशस्वी प्रवास केला आहे. अनेक गाण्यांचे कार्यक्रम केले, मोठ्या सुप्रसिद्ध गायकांसमवेत गाण्याची संधी मिळाली. आज त्याला ‘नाव’ आहे, ‘यश’ आहे, ‘कीर्ति’ आहे तरीदेखील माझा हा जिवलग मित्र माझ्यासाठी दुसरा ‘देव आनंद’च आहे!!!

– – सुरेश नावडकर ३-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on एव्हरग्रीन चंद्रशेखर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..