माऊ
मला लहानपणापासून आवडणारा एकमेव प्राणी एकच, तो म्हणजे मनीमाऊ! गावी असताना कुठेही मांजरं दिसायची, ती राखाडी रंगाचीच. ती कधी जवळ यायची नाहीत. पकडायला गेलं तर फिसऽ करुन फिसकरायची. एखादं दुसरं पांढरं मांजर असेल तर ते चूल विझल्यावर राखेत बसून पार ‘गोसावडं’ झालेलं असायचं. कधी त्यानं दूधात तोंड घातलं तर त्याला माझी काकू चुलीवरची फुंकणी फेकून मारायची.. गावात फासेपारधी फिरताना दिसले की, मोठी माणसांनी सांगितलेलं आठवायचं.. फासेपारधी बोके पकडून नेतात व खातात.. […]