नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

‘लेडी विथ द लॅम्प’

परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं. […]

मोराचा पिसारा..

सरस्वतीचं वाहन मोर. सरस्वतीच्या सानिध्यात असलेल्या मोराचं कोणतंही पिस पहा.. ती सर्व एकसारखीच छान दिसतात. त्यांच्यात हे चांगलं, ते बरं.. अशी तुलना करता येत नाही… अगदी तसंच जगदीश खेबुडकर यांच्या प्रत्येक चित्रपट गीतांबद्दल आपण म्हणू शकतो. या अलौकिक सरस्वतीच्या पुजाऱ्यानं मराठी चित्रपटांसाठी जेवढी गीतं लिहिली, ती एकाहून एक सरस आहेत… […]

फिरुनी नवी, जन्मेन मी

एक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके! […]

‘धन’ की बात

कोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या वर्षीपेक्षा यावेळी सामान्य जनता कमालीची घाबरून गेली. पहिल्या लाटेमुळे बंद झालेले कामधंदे पुन्हा कुठे सुरळीत चालू झाले तर, या मार्च महिन्यापासून कोरोना बाधितांचा आकडा पाऱ्यासारखा वाढू लागला. […]

दिवाळी आली, दिवाळी संपली…

पूर्वी भेटकार्ड पाठवून शुभेच्छा पोस्टाने पाठविलेल्या जायच्या. त्याचं उत्तर आलं की समाधान वाटायचं. त्यासाठी पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचो. आता पोस्टमन गायब झालाय. शुभेच्छा कार्डला स्मार्ट फोनच्या व्हाॅटसअपचा पर्याय आलाय. […]

आकाश कंदील

आमचा आकाशकंदील पाहून शेजारील जय भारत स्टोअर्समध्ये बाबुलाल शेठजींकडे कामाला असणारे, दगडूशेठ घरी आले व त्यांनी आकाशकंदीलासाठी येणारा खर्च विचारला. मी प्रामाणिकपणे जो खर्च आला तो त्यांना सांगितला. त्यांनी त्वरीत ती रक्कम खिशातून काढून माझ्या हातावर ठेवली व आकाशकंदील तयार करायला सांगितलं. […]

1 39 40 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..