नवीन लेखन...

मैत्र पत्रांचे – २

रांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत. ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते. अर्थात सुखद धक्के. कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली. […]

एक सैनिक ‘ बाप ‘

एक सैनिक ही बापचं असतो जरी तो घरापासून दूरवर असतो, तुझ्या जन्माचा आनंद ही घेता आला नाही बाप म्हणून गावभर मिरवता ही आले नाही, तुझ्या आठवणीत उश्या खाली रडतो या सैनिकांचं मन कोण भला जाणतो, घरी आल्यावर ओळखशील का ग मला.. बाबा बाबा हाक मारशील ना ग मला.. ना बाहुली ना खेळणी आणली मी तुला आल्यानंतर […]

बाकावरचे दिवस

पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे. […]

अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. […]

आकाशगंगांचे निर्माते

…… माझ्या दृष्टीने ही विद्यापीठे आहेत. त्यांच्या शिष्यांनी आपलं आभाळ व्यापलंय, पण आभाळात अशा असंख्य आकाशगंगा असतात. या तीन आकाशगंगांच्या निर्मात्यांबद्दल आज एवढंच ! […]

विद्वान सर्वत्र पूज्यते

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ अशी ओळ एका संस्कृत श्लोकात आहे. विद्वानांना सर्व ठिकाणी सन्मान मिळतो असा त्याचा अर्थ. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असलेला त्या विषयात विद्वान समजला जातो. विद्वत्ता आणि बुध्दिमत्ता वेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दिमत्तेला अनेक पैलू असल्याचे लक्षात आले आहे. नुसत्या IQ वरून बुध्दिमत्तेचे मोजमाप होऊ शकत नाही हेही समजले आहे. तसे विद्वत्तेला पैलू आहेत का? […]

मैत्र पत्रांचे – १

आयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो. माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी … १९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा. […]

लढवय्या बापाचा शेवट

… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ??? […]

‘काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !

फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच. […]

नारायण भंडारीचं काय झालं – भाग ३

एका दुकानात फेक न्यूज विक्रीला ठेवल्या होत्या . एका टपरीवर चहाबरोबर वेबसिरीज च्या सीडीज फुकट वाटायला ठेवल्या होत्या .
अनेक दुकानात गुन्हेगारांची चरित्रं आणि त्यांच्या गॉडफादर्सची गोपनीय माहिती विक्रीसाठी होती. फेरीवाल्यांच्या टोपल्यात दुनियेतील सगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या गोळ्या, पुड्या, हुक्के आणि अत्याधुनिक ड्रग्स उपलब्ध होती. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..