नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी, बघण्याची मज ओढ लागली, फुलूनी गेली बाग कशी ही, बीजे जयांची तूच पेरीली ।।१।। कल्पकता ही अंगी असूनी, दूरद्दष्टीचा लाभ वसे, अंधारातील दुःखी जनांची, चाहूल तुज झाली असे ।।२।। शीतल करुनी दुःख तयांचे, जगण्याचा तो मार्ग दाखविला, सोडूनी सारे वाटेवरी, आकस्मित तू निघूनी गेला ।।३।। आस्तित्वाची चाहूल येते, आज इथे केंव्हातरी, […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती  १ उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत   २ ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने   ३ वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे   ४ मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून […]

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।।   ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं […]

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। १ निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। २ दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। ३ तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  […]

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]

1 2 3 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..