१०० शतके आणि १०० स्वाक्षऱ्या
माझा लागोपाठ ३ ऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला परंतु त्याची तयारी १९९० साली सुरु केली होती. त्या आधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने हॅरिस शिल्ड मध्ये रेकॉर्ड केला तो २४ फेब्रुवारी १९८८ रोजी केला . त्यानंतर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. कधी मैदानावर तर कधी एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर असे तेव्हा दोन चार स्वाक्षऱ्या घेत असे. पण रेकॉर्ड वगैरे हा प्रकार मनातही नव्हता. […]