नवीन लेखन...

गाणारी बोटे.. गोविंदराव पटवर्धन

गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

त्यांचे काका शंकरराव पटवर्धन आणि मामा गोविंदराव कानिटकर हे गात असत . त्यावेळी शंकरराव यांना हार्मोनियम शिकवयाला हरिभाऊ पराडकर येत असत. ती शिकवणी झाली की लहान असलेल्या गोविंदाही पेटी वाजवायला लागे. गोविंदराव सहा वर्षाचे असताना स्वातंत्र्यचळवळीत होणाऱ्या प्रभातफेऱ्यांमध्ये गाण्याना साथ करू लागले. गोविंदराव यांना सुरतालाची जाण उपजतच असल्यामुळे कोणतेही रूढ शिक्षण न घेता वयाच्या तेराव्या वरपासून हार्मोनियम आणि तबला वाजवू लागले.

त्यांनी काही काळ पुढे हरिभाऊ पराडकर आणि पुरुषोत्तम सोलापूरकर यांच्याकडे शिक्षण घेतले. पी. मधुकर , राईलकर , नन्हेबाबू यांचे शिष्य नागपूर येथे असलेले चौरीकर अशा वादकांचे एकलवादन म्हणजे सोलो वादन त्यांना प्रभावित करून गेले. गोविंदराव टेंबे ,शंकरराव खातू आणि पी. मधुकर यांच्या सहवासातून ते काही गोष्टी शिकले.

गोविंदराव पटवर्धन यांनी प्रथम पुरुषोत्तम सोळांकुरकर यांना हार्मोनियमची साथ केली आणि तिथून त्यांची सुरवात झाली असे म्हणावे लागेल. त्यांनी १९४२ पासून मुबई मराठी साहित्य संघ , ललितकलादर्शक आणि इतर अनेक नाट्यसंस्थांच्या हजारो प्रयोगांना ऑर्गनची साथ केली. त्यांना अनेक संगीत नाटके पाठ होती आणि त्यांचे तासनतास चालणारे शेकडो प्रयोग त्यांनी सहजपणे वाजवले. ऑर्गनवर ते नेमकेपणाने सूर देत मग गायकाची पट्टी कोणतीही असो. नाट्यसंगीतासाठी बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, पं. राम मराठे , भालचंद्र पेंढारकर , छोटा गंधर्व , सुरेश हळदणकर , वसंतराव देशपांडे , प्रसाद सावकार , जयमाला शिलेदार अशा अनेक कलाकारांना खूप साथ दिली. जय जय गोरी शंकर , मंदारमाला , पंडितराज जगन्नाथ , कट्यार काळजात घुसली अशा अनेक नाटकात त्यांनी वाजवले. त्याचप्रमाणे कुमार गंधर्व , रामभाऊ मराठे , वसंतराव देशपांडे , माणिक वर्मा, सुरेश हळदणकर यांना त्यांची नेहमी साथ असे.

१९७६ साली गुहागरच्या गावकऱ्यांनी ‘ संगीत सौभद्र ‘ या नाटकात भूमिकाही त्यांनी केली होती . त्याचप्रमाणे ते अनेक नवोदित गायक-गायिकांना नाट्यपदेही बसवून देत.

१९४२ पासून कुमार गंधर्व , १९४४ पासून पं. राम मराठे , १९६१ पासून माणिक वर्मा , १९६८ पासून वसंतराव देशपांडे यांना साथ करू लागले. त्यांनी त्यांच्याबरोबर शेकडो मैफली केल्या. गायक गाईल ते सर्व आपल्या वाद्यातून वाजवण्याची क्षमता आणि महत्वाकांक्षा त्यांच्यात होती. परंतु हे सर्व करताना गायकाच्यावर कुरघोडी आणि श्रुतींशी त्यांचा आपल्या वाजवण्याने वेगळाच संवाद चालत असे. आपल्या वादनातून ते कलाकाराला निश्चितपणे खुलवत असत, प्रोत्साहन देत असत. त्यांचे हात, बोटे अत्यंत चपळपणे , तर कधी हळुवारपणे ऑर्गन आणि हार्मोनियमवर फिरत , पु. ल. देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटले होते , गोविदरावांची बोटे ‘ गातात ‘. ज्यांनी हे बघीतले आहे त्यांना निश्चित जाणवले असेल . मी त्यांचे कार्यक्रम अनेक वेळा बघीतले आहेत परंतु त्यांची माझी भेट माझे मित्र अनिल दिवेकर यांच्यामुळे घडली , अनिल दिवेकर हे दूरदर्शनचे प्रमुख कॅमेरामन होते, दूरदर्शनच्या बाजूलाच छोटे हॉटेल होते तिथे आम्ही दुपारी गप्पा मारत बसलो होतो, तेव्हाच त्यांची स्वाक्षरी घेतली होती गोविदराव पटवर्धन हे अनेक गायकांची उत्तम साथ तर करत परंतु आपणही एक ‘ शिष्य ‘ आहोत याचेही भान त्यांना असे. त्यांच्या एकतालवादनात पं. राम मराठे यांच्या गायकीची सुंदर साथ दिसत असे.

गोविदरावांनी त्यांची मुलगी वासंती आणि कालिंदी यांना अनुक्रमे व्हायोलिन आणि हार्मोनियममध्ये तयार केले. त्यांचे शिष्य विशवनाथ कान्हेरे , डॉ. विद्याधर ओक , मकरंद कुंडले यांना त्यांनी मुक्तहस्ताने शिकवले.

पुरस्कारांपासून ते नेहमीच वंचित राहिले परंतु त्यांना रसिकांनी सतत दिलेली साथ आणि त्यांचा सन्मान हेच खरे त्यांचे पुरस्कार होते. कुणातरी त्यांना ‘ गोविंदराव पेटीवर्धन ‘ असे म्हटले आहे कारण त्यांचे पेटीशी आजन्म सानिध्य होते.

अशा आपल्या ‘ बोटानी गाणाऱ्या ‘ गोविदराव पटवर्धन यांना 30 जानेवारी १९९६ रोजी हृद्यविकाराचा सौम्य झटका आला आणि एखादी सुरांची पट्टी बदलावी तसे शांतपणे, सहजपणे या जगातून ते निघून गेले.

-सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..