नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

‘मी आणि ती’ – १

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात… […]

माझे ‘शब्दालय’

माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल. […]

‘संगीतभूषण’ पंडित राम मराठे यांची स्वाक्षरी

एका दिवसात सौभद्र, सुवर्णतुला, स्वयंवर या तीन नाटकात तीन कृष्ण साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हती ती त्यांनी केली. त्यांचे ‘ जय जय गौरीशंकर ‘ तर आजतगायत कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी चित्रपटातून भूमिकाही केल्या त्यात व्ही. शाताराम यांचा ‘ माणूस ‘ चित्रपट आपण विसरू शकत नाहीत. […]

अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल […]

सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची स्वाक्षरी

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. […]

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांची स्वाक्षरी

शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.
[…]

सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव यांची स्वाक्षरी

मा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला. […]

तो.. ती.. आणि मी !

तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद […]

अभिनेते ओम पुरी यांच्या जन्मतारखेची मजा..

ओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..