
मूलांक ८ (जन्मतारीख ८, १७, २६) चा स्वामी शनी देव आहे. हे लोक अत्यंत शिस्तप्रिय, मेहनती, गंभीर आणि न्यायप्रिय असतात. दिसायला शांत पण मनातून खोल विचार करणारे हे लोक सहसा वयाच्या ३०-३५ नंतर खूप श्रीमंत होतात .लोक आयुष्यात मोठे ध्येय साध्य करतात आणि संघर्ष करून यशाच्या शिखरावर पोहोचतात.
अंकशास्रा प्रमाणे ( Numerology Of Mulank 8:) मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. शनी प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. राशींप्रमाणेच अंकशास्त्रात देखील मूलांकावरुन (Mulank) व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी कळतात. यासाठी आज आपण मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात की, या मूलांकाच्या लोकांवर शनीदेवाची विशेष कृपा असते. या जन्मतारखेच्या लोकांचा सुरुवातीलाच काळ फार संघर्षाचा असतो. मात्र, नंतर हे लोक राजेशाही थाटात जगतात. आज आपण मूलांक ८ च्या संदर्भात जाणून घेणार आहोत राजासारखं जीवन जगतात आज आपण मूलांक ८ च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. या मूलांकाचा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या ८, १७ व २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. या जन्मतारखेच्या लोकांचं आध्यात्मिक तसेच, धार्मिक कार्यात मन रमतं. मात्र, त्यांना फार उशीराने त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं. याच कारणामुळे अनेकदा हे लोक हिंमत हरतात.
शनीची कृपा असते:
मूलांक असणारे लोक शनीदेवाला प्रचंड प्रिय असतात. असं म्हणतात की, या जन्मतारखेचे लोक जर योग्य दिशेने मेहनत करतील तर एका ठराविक काळानंतर श्रीमंत होऊ शकतात. या जन्मतारखेच्या लोकांकडे सुख-सुविधांची कमी नसते.
हळुहळू यश मिळतं:
ज्याप्रमाणे शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. त्याचप्रमाणे या जन्मतारखेच्या लोकांनाही हळुहळू यश मिळतं. त्यामुळेच यांना धैर्य ठेवण्यास सांगितलं जातं. वयाच्या ‘या’ टप्प्यात श्रीमंती मिळते या जन्मतारखेच्या लोकांबद्दल असं म्हणतात की, या लोकांना वयाच्या तिशी, चाळीशीनंतर यश मिळतं. मात्र, त्याआधी त्यांना फार मेहनत घ्यावी लागते. मात्र, जसे ते वयाच्या तिशीत येतात त्यांच्या सर्व मेहनतीचं फळ त्यांना मिळतं. कालांतराने या जन्मतारखेचे लोक श्रीमंत होतात. याचं कारण म्हणजे यांच्यावर शनी महाराजांचा प्रभाव असतो.
‘या’ गुणामुळे यशस्वी होतात:
या जन्मतारखेचे लोक फार धैर्यवान असतात. याच गुणामुळे यांना आयुष्यात फार यश मिळतं. हे लोक पटकन हार मानत नाहीत. अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाच्या संख्येला विशेष महत्त्व आहे. या मूलांक संख्येवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्त्व ओळखता येते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात (Numerology) मूलांक ८ हा खूप खास मानला आहे. हा मूलांक शनीचा अंक मानला जातो. अंकशास्त्रानुसार ज्यांचा मूलांक 8 असतो अशा लोकांवर शनीची विशेष कृपा असते. शनीचा यांच्यावर आशीर्वाद असल्याने या मूलांकाच्या लोकांना जीवनात खूप यश मिळते. मूलांक ८ मध्ये आणखी कोणकोणत्या खास गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात.
शांत आणि गंभीर स्वभाव:
मूलांक ८ असलेले लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात. हे लोक संसाराच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात. या मूलांकाचे लोक अतिशय शांत, गंभीर आणि निष्पाप स्वभावाचे असतात. तसचे, हळूहळू यशाच्या शिखराच्या पायऱ्या चढतात.८ वा क्रमांक असलेले लोक खूप मेहनती असतात आणि कठोर परिश्रमाने आपले स्थान प्राप्त करतात. या लोकांनी एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते साध्य केल्यावरच ते समाधानी मानतात. या मूलांकाचे लोक अपयशाने निराश होत नाहीत तर पूर्ण धैर्याने आलेल्या संकटांचा सामना करतात. या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात थोडा संघर्ष करावा लागतो. शनीची कृपा राहते शनी हा मूलांक ८ चा स्वामी मानला जातो. यामुळेच ८अंक असलेल्या लोकांवर शनीची कृपा नेहमीच असते. शनीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. त्यांचे आर्थिक जीवन खूप चांगले असते. या लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती चांगली असते. या नंबरची खास गोष्ट म्हणजे ते कधीही फालतू खर्च करत नाहीत. या मूलांकाचे लोक पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. हे लोक फार कमी लोकांशी मैत्री करतात पण त्यांचे मित्र खूप खरे असतात.
प्रेम आणि वैवाहिक जीवन क्रमांक८ चे लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान नसतात. त्यांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. नात्यात अनेकदा त्यांची फसवणूक होते. त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याची शक्यता असते. तसेच, या लोकांचं लग्न खूप उशिरा ठरते. या रॅडिक्स नंबरच्या काही लोकांना मुले होण्यास विलंब होतो.
एकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे मूलांक ८
आध्यात्मिक मूलांक ८
मूलांक ८ हा एकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे दुसऱ्यांवर प्रकट न होणारा अंक आहे. त्याला भौतिकवादी समाजाकडून स्वतची उपेक्षा झाल्याची तक्रार असते. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचे तांत्रिक ज्ञान हे सर्वसाधारण लोकांपेक्षा अधिक असते. त्यांना प्रत्येक विषयाची थोडीफार माहिती असते. या व्यक्ती स्वतच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करु शकत नाहीत. त्यामुळे अडचणीच्या वेळी त्यांना सहानुभूती मिळत नाही.
स्वभाव-
मूलांक ८चा स्वभाव सामान्यत: गंभीर असतो. हे लोक बाहेरुन शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात वैचारिक घुसळण सुरूच असते. परतुं विषयाची मांडणी करताना ते विषयापासून दूर जातात. इतरांना मदत करायला ते तयार असतात, परंतु इतरांनी त्यांना मदत न केल्याची त्यांची तक्रार असते. उच्चपदस्थ व्यक्तीसमोर हे लोक सहज मान झुकवतात.
पुढे पहा मूलांक ८ च्या व्यक्तींचे गुण व अवगुण:
व्यक्तिमत्व- मूलांक ८ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व उदार, गंभीर आणि रहस्यमय असते. ते निर्भीड असतात. ते उत्साही, सक्रिय आणि स्पष्टवक्ते असतात. अनेकदा ते आश्चर्यकारक कामं करुन जातात. अनेकदा या व्यक्ती उदास दिसतात. वेगवान प्रगती करण्याची भावना यांच्या मनात खदखदत असते. त्यांना घाई असते. पण अपयश आल्यास ते स्वतला दोष न देता इतरांना आपल्या भाग्याचे दोषी ठरवतात. भौतिक समृध्दी व सफलता यांबाबत मूलांक ८ हा सर्वाधिक अपयशी अंक मानला जातो. परंतु आध्यात्मिक उत्कर्षांसाठी हा अंक यशस्वी ठरतो.
गुण- या व्यक्तींमध्ये बुध्दिमत्ता, गंभीरपणा, भावुकता, दूदर्शीपणा यांसारखे गुण असतात. स्वाभिमान तर यांच्यात सहज असतोच. ते उत्साही, सतत सक्रीय राहणारे आणि स्पष्टवक्ते असतात.
अवगुण– या व्यक्तींना त्यांच्यावर झालेली निष्पक्ष टीका ऐकवत नाही. थोडय़ाशा विरोधानेही हे लोक विचलित होतात. यांच्याकडे झालेल्या दूर्लक्षामुळे त्यांना खूप त्रास होतो. घाई गडबडीत हे लोक चुकीचा निर्णय घेऊन बसतात, आणि त्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते.
आर्थिक कौशल्ये आणि मदत करण्याची वृत्ती:
मूलांक ८ असलेल्या व्यक्ती आर्थिक सल्ल्याबाबतीत उत्तम असतात. पैसा कसा वाचवायचा आणि कुठे गुंतवायचा याबद्दल त्या इतरांना चांगला सल्ला देतात. या व्यक्ती इतरांची मदत करतात, पण त्यामागील गणितेही त्यांना चांगलीच माहीत असतात.
प्रचंड कष्टांनंतर संघर्ष:
चित्रपटासारखे ८ मूलांक असलेल्यांचे असते आयुष्य: या मूलांकाच्या व्यक्तींना प्रचंड कष्ट करावे लागतात चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने दाखवतात की खूप संघर्ष होतो मात्र अखेर ही गोड होते, तसंच काहीसं ८ मूलांक असलेल्यांसोबत होतं. या व्यक्तींना 35-40 वर्षांपर्यंत प्रचंड कष्ट करावे लागतात. साध्या साध्या गोष्टीही त्यांना मिळवताना प्रचंड मेहनत करावी लागते. ज्या गोष्टी इतरांसाठी साखरेच्या दाण्यासारख्या असतात त्या ८ मूलांक असलेल्यांसाठी हिमालयासारख्या होतात. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना चांगले दिवस पाहायला मिळतात. हे जरी खरं असलं तरी कष्ट त्यांची पाठ सोडत नाही. अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींचा मूलांक ८ असतो, त्यांच्या आयुष्यात संघर्ष आणि यशाचे अनोखे मिश्रण असते.
मूलांक ८ चे लोक कर्जात असतात मूलांक ८ च्या व्यक्तींना नेहमी कर्जाचा सामना करावाच लागतो बरेच जण कर्जातून बाहेर निघत नाहीत किंवा एका कर्जावर अजून कर्ज घेताना दिसतात. पण ह्यांना त्यासाठी पैसा मिळतो काळजी नाही.
धोका:
कोणतीही नशा आपण घेत असाल आणि आपला मूलांक किंवा भाग्यांक ८ असेल तर आयुष्यात हि मोठी चूक असेल . करिअर हेल्थ पैसा रिलेशन ह्यापैकी कोणतीतरी एक गोष्ट त्याने कायमची निघून जाईल. मग त्यावर काहीच काम करून फायदा होत नाही.
दिलासा मिळण्यासाठी मूलांक ८ वाल्यांनी काय करावे ?
भावना उपाध्याय यांच्या मते, गरिबांची सेवा केल्याने ८ मूलांक असलेल्या व्यक्तींची प्रगती होते. शनिदेव जेव्हा देतात, तेव्हा ते भरभरून देतात आणि भरभराट करतात. शनिदेवाची आराधना करून मनोमन एखादी इच्छा व्यक्त केल्यास, शनिदेव ती पूर्ण करतात असे मानले जाते. अॅस्ट्रो अरुण पंडित यांनीही लोकांची मदत करणे हाच ८ मूलांकाच्या व्यक्तींसाठी सर्वात चांगला उपाय असल्याचे म्हटले आहे. मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींचे ५ आणि ६ क्रमांकाच्या लोकांशी चांगले जमते. मूलांक ५ चा शासक ग्रह बुध आहे, तर मूलांक ६ चा ग्रह शुक्र आहे. मूलांक १ असणाऱ्या लोकांशी त्यांचे अजिबात पटत नाही कारण त्याचा अधिपती सूर्य ग्रह आहे. पहा ८ मूलांक असणार्यांची शुभ तिथी, दिवस व रंग…
शुभ तिथी- प्रत्येक महिन्याची २, ४, ८, ११, १३, १७, २०, २२ आणि २६ तारीख मूलांक ८ असलेल्या लोकांसाठी शुभ असतात.
शुभ दिवस- शनिवार हा तुमच्यासाठी सर्वाधिक अनुकूल दिवस आहे. बुधवार आणि शुक्रवारही तुमच्यासाठी शुभ ठरतील.
संबंधांसाठी शुभ मूलांक- मूलांक ८ असलेल्या लोकांचे मूलांक ४ असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य चांगले असते. मूलांक २च्या व्यक्तीही त्यांच्यासाठी सफल ठरतात. मात्र मूलांक १, ३ व ९ पासून यांनी दूर राहिलेले चांगले.
शुभ रंग- निळा, सफेद, राखाडी, हिरवा आणि वांगी रंग तुमच्यासाठी शुभ आहेत.
शुभ वर्षे- ४, ८, १३, १७, २२, २६, ३१, ३५, ४०, ४४, ५३, ६२ आणि ६७वे वर्ष आपल्याला अनुकूल आहे.
पुढे पहा भाग्यशाली रत्न, मंत्र व उपाय…
भाग्य रत्न- नीलमणी म्हणजे नीलम तुमच्यासाठी सर्वाधिक शुभ आहे. त्याला चांदीच्या अंगठीत ठेऊन शनिवारच्या दिवशी मधल्या बोटात घालणे शुभ ठरेल.
कल्याणकारी देव- शनि, हनुमान आणि शंकराची उपासना केल्यास विशेष लाभ होईल.
कल्याणकारी मंत्र-
ॐ श्रीं शं शनैश्चराय श्रीं नम:
ॐ ह्रौं जूं स:
ॐ हं हनुमंते नम:
भाग्योदयकारी उपाय-संकटांपासून बचाव करण्यासाठी दर शनिवारी तेलाच्या दिव्यामध्ये स्वतचे प्रतिबिंब बघून तो दिवा देवळात लावा. तसंच दर शनिवारी लोखंडाच्या वस्तू, तेल, चामडय़ाच्या वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे दान करा. मानसिक ताण आणि कठीण परीस्थितीच्या निवारणासाठी दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्यास लाभदायक ठरेल.
दिलासा मिळण्यासाठी मूलांक ८ वाल्यांनी काय करावे ?
भावना उपाध्याय यांच्या मते, गरिबांची सेवा केल्याने ८ मूलांक असलेल्या व्यक्तींची प्रगती होते. शनिदेव जेव्हा देतात, तेव्हा ते भरभरून देतात आणि भरभराट करतात. शनिदेवाची आराधना करून मनोमन एखादी इच्छा व्यक्त केल्यास, शनिदेव ती पूर्ण करतात असे मानले जाते. अॅस्ट्रो अरुण पंडित यांनीही लोकांची मदत करणे हाच ८ मूलांकाच्या व्यक्तींसाठी सर्वात चांगला उपाय असल्याचे म्हटले आहे.
मूलांक ८ (जन्मतारीख: ८, १७, २६): २०२६ चे भविष्य:
जन्मांक ८ साठी ‘राजयोग’ आणि प्रगतीचे वर्ष! शनी आणि सूर्याच्या कृपेने लाभणार अफाट यश. शनीची न्यायदृष्टी आणि सूर्याचं तेज! जन्मांक ८ च्या जातकांसाठी २०२६ हे वर्ष यशाचे नवे आयाम प्रस्थापित करणारं ठरेल. त्यांच्यासाठी हे वर्ष करिअरमधील मोठी झेप आणि आर्थिक सुबत्ता घेऊन आलं आहे २०२६ हे मूलांक ८ असलेल्यांसाठी धाडस, कृती आणि उत्कटतेचे वर्ष असेल. या वर्षी तुम्हाला तुमचा राग आणि आवेगांवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण संघर्ष उद्भवू शकतात. हे वर्ष त्यागाचे आणि तुमच्या पुढील कृतींचे नियोजन करण्याचे वर्ष आहे. २०२६ मध्ये, तुम्ही तुमची अपूर्ण कामे पूर्ण करू शकता; तुम्हाला वादविवाद टाळावे लागतील. या वर्षी गुंतवणूक करण्याऐवजी बचतीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमचा आध्यात्मिक कल देखील वाढू शकतो. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसानास कारणीभूत ठरू शकतात. गुंतवणूक नफा देईल, परंतु लोभ टाळा. तुम्ही सामाजिक जीवनात सक्रिय असाल. हे वर्ष जुने वाद सोडवण्याचा काळ आहे. ते शांततेने सोडवा आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
या वर्षी, दीर्घकालीन प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. हे वर्ष प्रेमविवाहांसाठी योग्य नाही; ते टाळा. अविवाहित लोकांसाठी लग्न शक्य आहे आणि कुटुंबात शुभ घटना घडू शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०४.०४.२०२६

