नवीन लेखन...

गुरुजी सांगा कोणाचे?

प्रश्न पडण्याचे कारण की शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की गुरुजी आयोगाचे, कां शाळेचे, कां विद्यार्थ्यांचे, कां सरकारचें, का संस्था चालकांचे ? शिक्षकांची भूमिका करणं व शिक्षकांची भूमिका जगणं वेगळं यात फारकत झाल्यामुळें गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्ते वर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत. मुलींशी गैरवर्तन करणारे अनेक गुरुजी मुलींना आवडत नाहीत.

पावसात बागेत नेऊन कविता शिकवणं ही पूर्वी काही शिक्षकांची भूमिका होती. मूल्यांची रुजवणूक व्हावी म्हणून भूमिका व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची भूमिका या दोन बाबी वेगळ्या आहेत. आमच्या गुरुजी मुळे आमचे संबोध स्पष्ट झाले आम्हाला आमचे इंग्रजीचे स्पेलिंग पाठ व्हायचे, पाढे पाठ व्हायचें असं म्हणणारी पिढी आज आहे, गुरुजी त्यांचे होते व ते गुरुजीचे होतें. समाजप्रबोधनासाठी आलेली साधनं मनोरंजनात इतकी रुतली की मुलांना भवतालाच भान राहिलं नाही. गेम्स, कार्टून, रील , ए.आय मुलें केवळ गुरुजी वर विद्यार्थी अवलंबून नाहीत. अब्राहम लिंकन नंतर कोणीही मुख्याध्यापकांना पत्र पाठवलं नाही की माझ्या मुलाला हे शिकवां ते शिकवा. परीस स्पर्श म्हणजे काय असतं हे काही शिक्षकांनी सिद्ध केलं आहे. गुरुजी मुळेच संस्कृती संवर्धन होणार आहे. काही शिक्षक आपल्यावर संस्कार करतअसतात. एक तरी ओवी अनुभवावी प्रमाणे काही शिक्षक अनुभवायला हवेत.. भालचंद्र मुणगेकर आज आले नाहीत म्हणणारे शिक्षक होते म्हणून मुणगेकर घडले.आज गुरुजीला विद्यार्थी माहित नाहीत व विद्यार्थ्यांना गुरुजी माहित नाहीत नाही.

Education is a lifelong processहे विसरून आपण पॅटर्नला महत्त्व देत आहोत. There is no shortcut to success खोटं ठरवण्याच्या पद्धती विकसित होत आहेत. यशस्वी जीवन जगण्याचा कोणी विचार करत नाही. प्रत्येकाला फक्त यशस्वी पॅकेज देणारं शिक्षण हवं. मुलांना गुरुजी नको आहे, त्यांनी दिलेले परीक्षेतील प्रश्न हवे आहेत. पालकांनी शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांना ९९.९%ची झापड बांधल्यामुळे त्यांना इतर काही दिसत नाही. २१ अपेक्षित, गाईड, कोचिंग हेच मुलांचे आवडते आहेत. संस्कार करणारे प्रसंगच कुटुंबात,शाळेत खंडित झाले आहेत. आजचा विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नाही तर स्पर्धेसाठी शिक्षण घेत आहे, शिक्षण आज आदर्शा पासून फारकत घेत आहे. शिक्षणाचे उद्देश व जगण्याचे उद्देश वेगवेगळे झाले आहेत. ज्ञानासाठी नव्हे तर हवें तेवढेच व माहिती पुरतेच शिकायचें. मग गुरुजी हवेतच कशाला? गुगल, एक.आय. 24 तास विद्यार्थ्यांचे सेवेत असतात. समाजासाठी नव्हे तर फक्त स्वतःसाठीच उपयोगी होईल यासाठी शिकायचे. पुन्हा एकदा आदर्श, मूल्यें यांची गरज निर्माण झालेली आहे व त्या दृष्टीने आदर्शाचा विचार करणे आवश्यकच बनले आहे. गुरुजी घडवू शकतात व बिगढवू ही शकतात.एका चापटीत मृत्यूचा रस्ता दाखवणारे ही आहेत.

आई नंतर गुरुजीच असतात पण पैसे देऊन शिकवणीला येणाऱ्यांना चांगले शिकवले जाते. मग गुरुजी सर्वसामान्यांचे नाहीत का? मूल्यांचा जेव्हा ऱ्हास होतो तेव्हा आदर्शाची वानवा निर्माण होते. आदर्श सजीव रुपी आपल्या अवतीभवती जरी नसले तरी पुस्तकातून चांगल्या चांगल्या आदर्शाची पारायण केले जातात व आदर्श जिवंत ठेवला जातो. ज्ञानेश्वरीची पारायणे, तुकारामाचे अभंग, रामदास बोध हे आजही अनेकांचे आदर्श आहेत व त्यांच्या जीवनाची विचार प्रणाली सुद्धा त्यांच्या प्रमाणेच ठेवून ते स्वतःला कृतकृत्य मानतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे औद्योगिकीकरणामुळे इतकी भौतिक सुखाची रेलचेल झाली आहे की मुलांचे आदर्श बदलले आहेत. श्यामच्या आईचे संस्कार आज पालक करू शकत नाहीत कारण मुले कार्टून पाहत माणसांना तुच्छ समजत आहेत. पोकेमन, हल्क अवेंजर, स्पायडरमॅन हे त्यांचे आदर्श आहेत जे अस्तित्वात नाहीत. स्वप्नातलें आदर्श कामाला येत नाहीत, वास्तवातलें आदर्शच जगणं अर्थपूर्ण करतात. मुला समोरच्या आभासी आदर्श मुळे मुलें आज हतबल झाली आहेत. गुरुजी हा आज मुलांच्या समोरचा शेवटचा पर्यायनको. गुरुजी तुम्ही काहीतरी करा प्रेक्षक म्हणून तुम्ही आम्हाला नको आहात तर आदर्श शिक्षक म्हणून हवे आहात.

आजही अनेक गुरुजी विद्यार्थ्यांसाठी जगात आहेत. रमेश पानसे यांनी ग्रामीण भागात जाऊन ग्राममंगल ऐना येथे कायापालट केला आहे. वारे गुरुजींनी जागतिक पातळीवरचे चांगली प्रथम क्रमांकाची शाळा निर्माण केली आहे. अनेक गुरुजींनी आज स्वतःला सिद्ध केलं आहे. बदली झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या डोळ्यात अश्रूंची फुलेंआणणारे गुरुजी आजही आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे गुरुजी आजही आहेत.

डॉ.अनिल कुलकर्णी
९४०३८०५१५३

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 67 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..