
गेले ते दिन वैभवाचे, समाधानाचे, आनंदाचे भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करत माणसें जगतात. भूतकाळाच्या एका पारड्यात आनंद असेल तर दुसऱ्या पारड्यात आनंदच हवा तरच पारडं समान होईल. तुलना म्हणजे तराजूच. आनंदाच्या आठवणीवरच माणसें जगतात. आपने कभी थे अब है परायें ही जाणीव बेचैन करतें.
जीवनाचा खरा अर्थ राख आहे. शेवट राख होणार असली तरी राखेपर्यंत सर्वांना राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षी होण्याची आशा असते. माणसें आशा कधीच सोडत नाहीत, शेवटच्या क्षणापर्यंत. व्यक्तिमत्त्वाची हार माणसें शेवटपर्यंत स्वीकारत नाही. जगतांना सुद्धा माणसे स्वभावांची वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार याचा हिशोब करत राहतात. माणसें आठवणीवर जगतात.
पहिले भी यु तों बरसें थे बादल
पहले भी यु तों भीगा था आंचल
पहिल्या दिवसांच्या आठवणीच्या लोणच्यावर माणसं दिवस काढतात. गेले ते दिवस म्हणत म्हणत माणसे जगत असतात. क्यूँ हम बहारसे खुशिया उधार लें खरं असलं तरीही प्रत्येक वेळी श्रावण तोच असला तरी प्रत्येक वेळी वेगळा असतो, प्रत्येक वेळी श्रवणही वेगळें असतें सुर तेची छेडीता गीत उमटले नवें असाच असतं. खिडकीतून श्रावण निहाळतांना आज फिर जीने की की तमन्ना है आठवायचं आणि त्याच वेळेस बैठकीतील निवडुंग मरने का इरादा है याची जाणीव करून देत असतो. मेरे सुर मे सुर मिला दे तो जिंदगी हो जाये सफल हेच सत्य आहे म्हणून सुरात सुर मिसळले तरच सुरलीला अवतरतें.
डॉ. अनिल कुलकर्णी


Leave a Reply