नवीन लेखन...

शपथ

घेतलेल्या शपथा पुर्ण करताना आयुष्य निघून गेलं,
शपथेवर खरं बोलता बोलता म्हातारपण दारात आलं!

तुझी माझी शपथ घेता , मैत्री टिकत‌ होती,
बाकी च्या शपथां मधे देवांची लाईनच लागत होती !

प्रत्येक नव्या वळणावर एक नवी शपथ असायची!
शपथ मोडली की माणूस मरतो ही भिती मनात वसायची !

शपथेवर चालणारं आयुष्य खुप निरागस असायचं,
खोट्या शपथेला पण जग खरी समजून फसायचं!

बघता बघता सारं बदललं,
शपथांवर चालणारं जग खुप दुर गेलं !

सकाळ च्या शपथा ,दुपार पर्यंत चालत नाहीत ,
नती चरामी ची शपथ घेऊन ही ,घरं फार टिकत नाहीत!

कोर्टातल्या शपथा ,गितेवर हात ठेवून घेतात ,
पण सरळसरळ खोटं बोलताना त्या गितेला पण गोत्यात आणतात !

शपथांचं नातं आता वास्तवाशी नसतं ,
खोट्या शपथांच्या जिवावर जग छान चालत असतं !

— सुखदा प्रधान – सिंग

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..