नवीन लेखन...

सुवर्ण – झळाळी

मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.

असे म्हणतात की अगदी मद्ध्य रात्री सुद्धा सोने विकुन पैसे मिळु शकतात. असे कुठल्याच गुंतवणुकीत होत नाही. उलट जितकी जास्त वर्षे त्यातील गुंतवणूक ठेवलं तेवढा त्याचा फायदा होतो आणी संकट काळी काळजी करावी लागत नाही.
प्राचीन काळापासून आजपर्यंत, सोने हे संपत्ती, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेचे एक शक्तिशाली प्रतीक राहिले आहे, जे राजांच्या मुकुटांवर सिंहासनावर आणि धार्मिक संस्थांच्या पवित्र अवशेषांवर शोभून दिसते. सोने हे एक उत्तमतेचे परिमाण/ उदाहरण म्हणूनही वापरले जाते. उदा. गुळाचा रंग कसा आहे हे विचारले जाते तेंव्हा त्याचे उत्तर सोन्या सारखा पिवळा आहे हेच असते. जावई कसा आहे तर सोन्यासारखा आहे हे उत्तर असते. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती.

कोणत्या प्रकारचे सोने खरेदी करावे?
तुम्ही अजूनही सोने खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम प्रकार कोणता, याबद्दल संभ्रमात असाल, तर प्रत्यक्ष सोने बाळगण्यासाठी सोन्याची नाणी आणि बिस्किटे हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत . तुमच्यासाठी योग्य निवड तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर अवलंबून आहे: जर तुम्हाला प्रीमियम कमी करून पुनर्विक्रीचे मूल्य वाढवायचे असेल, तर बिस्किटे अधिक चांगली ठरू शकतात. भारतात सोन्याला दागिने, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे.

या लेखात आज आपण सोन्याची माहिती घेणार आहोत:
सोने (Gold ) हे एक अत्यंत दुर्मिळ, चमकदार आणि पिवळ्या रंगाचे बहुमोल धातू मूलद्रव्य आहे, ज्याची संज्ञा ‘Au’ (ऑरम) आणि अणुक्रमांक ७९ आहे. हे उत्कृष्ट विद्युत वाहक, गंजरोधक आणि आकार देण्याजोगा (malleable) धातू आहे.

 

गुणधर्म:
स्वर्ण पिवळ्या रंगाचे धातु आहे. अन्य धातुंच्या मिश्रणाने याच्या रंगात फरक पडतो. यात रजतचे मिश्रण करण्याने याचे रंग हल्के पडतात. ताम्रच्या मिश्रणाने पिवळा रंग गडद पडतो. मिनी गोल्ड मध्ये 8.33 प्रतिशत ताम्र असते. हे शुद्ध स्वर्णाने जास्त लाल होते. प्लैटिनम किंवा पेलैडियमच्या सम्मिश्रण ने सुवर्णा मध्ये श्वेत छटा येते. स्वर्ण अत्यंत कोमल धातु आहे. शुद्ध अवस्था मध्ये हे सर्वात अधिक धातवर्ध्य (malleable) आणि तन्य (ductile) धातु आहे. याला ठोकून ठोकून १०-५ मिमी पातळ वर्ख बनविले जाते.

सोन्याची शुद्धता कशी मोजतात?
सोन्याची शुद्धता ‘कॅरेट’ (Karat – K) मध्ये मोजली जाते. २४ कॅरेट (24K): ९९.९% ते ९९.९९% शुद्ध सोने. हे अत्यंत मऊ असते, त्यामुळे दागिन्यांसाठी वापरले जात नाही. २२ कॅरेट (22K): ९१.६% सोने आणि उर्वरित तांबे, चांदी, जस्त यांसारखे धातू. याला ‘९१६ गोल्ड’ असेही म्हणतात आणि ते दागिन्यांसाठी वापरले जाते.१८, १४, १० कॅरेट: यामध्ये सोन्याचे प्रमाण कमी (अनुक्रमे ७५%, ५८.३%, ४१.७%) असून इतर धातूंचे प्रमाण जास्त असते, जे दागिने अधिक मजबूत बनवतात. शुद्ध सोने ओळखण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा हॉलमार्क आणि ६-अंकी HUID नंबर तपासावा. यावरून सोन्याची शुद्धता आणि उत्पादकाची माहिती मिळते.

रत्न (हिरे) आणि सोन्याच्या संदर्भात “कॅरेट” चे दोन मुख्य अर्थ आहेत: रत्नांचे वजन (Carat – ct): १ कॅरेट = 200 मिलिग्रॅम (0.2 ग्रॅम). ५ कॅरेट म्हणजे १ ग्रॅम होतो. सोन्याची शुद्धता (Karat – K/kt): २४ कॅरेट म्हणजे 99.9% शुद्ध सोने.

सोन्यात, कॅरेट हे शुद्धतेचे प्रमाण आहे, वजनाचे नाही.
खऱ्या सोन्याचा रंग हा चकचकीत पिवळा व त्यास हिरवतटशीर झाक असते.

बहुतेक वेळा हिरा सोन्यामद्धे गुंफला जातो. 
थोडक्यात मुख्य फरक:
हिरा/रत्न (Carat – ct): हे वजन मोजते (1 ct = 0.2g).सोने (Karat – K): हे शुद्धता मोजते (24K म्हणजे १००% शुद्ध, 22K म्हणजे ९१.६% शुद्ध.

सोन्याची शुद्धता तपासण्याच्या प्रमुख पद्धती:
१. एक्स-रे फ्लूरोसेन्स (XRF) चाचणी: हे एक प्रगत तंत्र आहे जे दागिन्यांचे कोणतेही नुकसान (विना-विनाशकारी) न करता, त्यातील सोन्याची अचूक रचना आणि कॅरेट मोजते.

२. घनता (Density) चाचणी: आर्किमिडीजच्या तत्त्वावर आधारित मशिन्सद्वारे हवेतील वजन आणि पाण्यातील वजन यांच्या गुणोत्तरावरून सोन्याची शुद्धता (कॅरेटमध्ये) काढली जाते.

३. टचस्टोन आणि ऍसिड चाचणी: सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी पारंपारिक टचस्टोनवर घासून नायट्रिक ऍसिडचा वापर करून चाचणी केली जाते. नायट्रिक ॲसिड चाचणी, व्हिनेगर व चुंबक चाचणीद्वारे (शुद्ध सोने चुंबकाला चिकटत नाही) सोन्याची शुद्धता तपासता येते.

उत्पादन व साठे:
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, कॅनडा हे सोन्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतातील कोलार (कर्नाटक) आणि रामगिरी (आंध्र प्रदेश) ही मुख्य सोन्याची खाणी आहेत.

गुंतवणूक पर्याय:
सोन्यात प्रत्यक्ष (दागिने, नाणी, बिस्किटे) किंवा अप्रत्यक्ष (सॉव्हरिन गोल्ड बाँड्स, गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड) गुंतवणूक करता येते, जी महागाई विरुद्ध उत्तम संरक्षण मानली जाते. भारतीय संस्कृतीत सण, लग्न आणि उत्सवांमध्ये सोन्याला अपारंपरिक महत्त्व आहे आणि ते आर्थिक संकटात सोन्यावरील कर्जासारख्या (Gold Loan) सोयींद्वारे तरलतेचा उत्तम स्रोत ठरते.

कच्चे सोने:
जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात.  असे सांगण्यात येते की कोणतेही सरकार आपल्याकडे असलेल्या सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त नोटा छापू शकत नाही.सोन्याकडे एक सुरक्षित व निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते; काही गुंतवणूकदार प्रत्यक्ष मालकीसाठी तिजोरीत ठेवलेले सोने किंवा इतर भौतिक सोन्याच्या पद्धतींचा वापर करतात. अर्थव्यवस्थेला स्थैर्य यावे म्हणून देश सोन्याचा साठा करतात. सोने उत्तम विद्युत्‌वाहक आहे. ते कधीही गंजत नाही. त्यापासून सुतासारख्या तारा (जर) किंवा पातळ पत्रा बनवता येतो.

भारतासह जगातील इतर सर्व संस्कृतीमध्ये विशेष करून महिला सोन्याचे दागिने परिधान करताना दिसतात. भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेणे समजतात. सोन्याचे आयुर्वेदिक महत्त्वही खूप मोठे आहे.

सोन्याचे प्रमुख आयुर्वेदिक फायदे:
• स्मरणशक्ती आणि बुद्धीवर्धन: सुवर्णभस्म किंवा सोन्याच्या तारेचा मुलामा दिलेले औषध स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

• प्रतिकारशक्ती वाढवणे: सोन्याच्या सेवनामुळे शरीराचे बळ वाढते आणि थकवा दूर होतो. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना मध आणि तुपातून सुवर्णयुक्त औषधे दिली जातात.

• हृदय आणि त्वचा विकार: सोन्याच्या वापराने हृदयाचे आरोग्य सुधारते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आणि सांधेदुखीच्या (संधिवात) उपचारांमध्येही सोन्याचे घटक गुणकारी ठरतात.

• त्रिदोष संतुलन: वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राखण्यासाठी सुवर्णभस्म फायदेशीर ठरते. सोने शरीरावर परिधान केल्याचे अनेक फायदे आहेत. तत्कालीन लोकांना शास्त्रीय पद्धतीने हे सांगितले असते तर त्यांना ते समजले नसते. म्हणूनच की काय त्याला धर्माची जोड दिली गेलीं असावी. परंतु, सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे भारतीय स्त्रियांचे आरोग्य चांगले राहाते, यात मात्र शंका नाही.

सोन्याच्या तेजामुळे मनुष्य अत्यंत पुरातन काळापासून प्रभावित झाला आहे, कारण बहुधा सोने निसर्गात मुक्त अवस्थेत मिळते, हे असावे. प्राचीन संस्कृतिकाळातही या धातूला सन्मान प्राप्त होता. इसवी सनाच्या २५०० वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदारो व हड़प्पा येथे भग्नावस्थेत मिळालेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून स्वर्णाचा उपयोग आभूषणांसाठी केला जात होता, असे दिसते. त्या काळात दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रदेशातून हा धातू प्राप्त होत होता. चरकसंहितेमध्ये (इ.स.पू. ३०० वर्षांपासून) स्वर्ण तथा त्याच्या भस्माचे औषधि रूपात वर्णन आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुवर्णाच्या खाणीची ओळख करण्याचे उपाय धातुकर्म, विविध स्थानांपासून प्राप्त धातु आणि त्याच्या शोधाचे उपाय, सोन्याच्या शुद्धतेची कसोटीवर (एका प्रकारच्या दगडावर) परीक्षा आणि स्वर्णशाळेत त्याच्या तीन प्रकारचे उपयोगांवरचे (क्षेपण, गुण व क्षुद्रक यांच्यावरचे) वर्णन आले आहे. या सर्व वर्णनावरून हे माहित होते की त्या वेळी भारतात सुवर्णकलेचे स्तर फार उच्च होते.

सोन्याचे उपयोग:
सोन्याचा वापर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगांमध्ये केला जातो. वेगवेगळे जोड, तारांचे जोड यामध्ये सोन्याचा वापर केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात सोडियम ऑर्थिओमलेट वा ऑर्थिओग्लुकोज ही अल्पप्रमाणात सोन्याचा अंश असलेली औषधे बनवली गेली आहेत. काही आयुर्वेदिक औषधामद्धे सुवर्ण भस्म असते. सोन्याची काही समसंयुगे काही कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात. त्याचा उपयोग शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यातही होतो. इतिहास काळापासून पडलेल्या दाताच्या जागी सोन्याचा दात बसविण्याची प्रथा होती. अंतराळ क्षेत्रात सोन्याचा वापर होतो. तेथे उष्णतेचे नियमन करण्यासाठी सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरली जातात.

सोन्याचा मुलामा (Gilding):
एखाद्या पदार्थावर त्याच्या सुरक्षेसाठी किंवा त्याला शोभिवंत करण्यासाठी यांत्रिक आणि रासायनिक साधनांद्वारे सोने चढ़विले जाते. ही कला खूप प्राचीन आहे. इजिप्तवासी आदिकाळात लाकडांवर आणि अनेक प्रकारच्या धातूंवर सोन्याचा मुलामा देण्यात प्रवीण आणि कार्यरत होते. बायबल ग्रंथाच्या जुन्या टेस्टामेंटमध्ये पण गिल्डिंगचा उल्लेख मिळतो. रोम आणि ग्रीस इत्यादी देशात प्राचीन काळापासून या कलेला पूर्ण प्रोत्साहन मिळत राहिले. प्राचीन काळात जास्त जाडीची सोन्याची पाने प्रयोगामध्ये असायची. त्यामुळे या प्रकारची गिल्डिंग अधिक मजबूत व चमकदार होत गेली. जुन्या देशांच्या सजावटकलेत सोन्याच्या मुलाम्याचे प्रमुख स्थान आहे- मंदिरांचे घुमट आणि राजमहालांची शोभा वाढविण्यासाठी ही कला विशेषतः उपयोगात आणत. भारतात आजही सोन्याच्या मुलाम्याची कामे चालतात.

सोन्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत?
हजारो वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये सोने हे देवत्व, संपत्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक परंपरांमध्ये, ते सूर्याचे प्रतिनिधित्व करते, जे प्रकाश, ऊब आणि जीवनदायी ऊर्जेचे प्रतीक आहे. सोन्याचे कंगन घातल्याने ही तेजस्वी ऊर्जा प्रवाहित होते, ज्यामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि समृद्धी आकर्षित होण्यास मदत होते, असा विश्वास आहे. त्याला केवळ त्याच्या नेत्रदीपक सौंदर्यासाठीच नव्हे, तर त्याच्या गहन आध्यात्मिक महत्त्वासाठीही फार पूर्वीपासून आदर दिला जातो. प्राचीन संस्कृतींपासून ते आधुनिक समग्र उपचार पद्धतींपर्यंत, सोन्याच्या बांगड्यांना संतुलन, समृद्धी आणि आंतरिक सुसंवाद वाढवणारे शक्तिशाली तावीज म्हणून जपले गेले आहे. तुम्हाला पिवळ्या सोन्याचे तेजस्वी आकर्षण, पांढऱ्या सोन्याची आधुनिक भव्यता किंवा गुलाबी सोन्याची रोमँटिक ऊब यांपैकी कशाचेही आकर्षण असो, सोन्याचे दागिने परिधान करणे हा मन, शरीर आणि आत्म्यासाठी एक परिवर्तनकारी अनुभव असू शकतो.

सोन्यासोबत रत्ने जोडल्याने त्याचे आध्यात्मिक फायदे अधिक वाढू शकतात. उदाहरणार्थ, अॅमेथिस्ट जडवलेले सोन्याचे ब्रेसलेट शांतता आणि अंतर्ज्ञानाला चालना देऊ शकते, तर सिट्रीन जडवलेले सोन्याचे ब्रेसलेट अनेकदा समृद्धी आकर्षित करण्यासाठी घातले जाते. तुमच्या आध्यात्मिक ध्येयांशी जुळणारे ब्रेसलेट शोधण्यासाठी सोन्याच्या पेढीत रत्नजडित ब्रेसलेटचा संग्रह पाहा.

माननीय मोदीजींनी चे आवाहन:
माननीय पंतप्रधान मोदीजींनी भारतीयांना किमान एक वर्ष तरी सोने खरेदी करू नये असे आवाहन केले आहे. अमेरिका व इराण, इराक यांच्यातील युध्दामुळे नैसर्गिक वायू (पेट्रोल) व गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत हा जगातील सर्वात ज्यास्त सोन्याची आयात करतो.त्याचे तोटे त्यांनी वर्णन केले आहेत ते असे:

सोन्याच्या खरेदीतील प्रत्येक वाढीमुळे भारताची अमेरिकी डॉलरची मागणी वाढते, ज्यामुळे रुपया कमकुवत होऊ शकतो आणि देशाची चालू खात्यातील तूट वाढू शकते .

मुख्य मुद्दे
भारताने एका वर्षात जवळपास ७२ अब्ज डॉलर (७२x १०० अब्ज रुपये !!!) किमतीच्या सोन्याची आयात केली, ही आयात निम्म्याने कमी केल्यास अर्थव्यवस्थेची संभाव्यतः सुमारे ३६ अब्ज डॉलरची परकीय चलन बचत होऊ शकते.
सोन्याच्या खरेदीतील प्रत्येक वाढीमुळे भारताची अमेरिकी डॉलरची मागणी वाढते, ज्यामुळे रुपया कमकुवत होऊ शकतो आणि देशाची चालू खात्यातील तूट वाढू शकते.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या उपभोक्त्यांपैकी एक आहे, म्हणजेच भारतीय मागणीतील बदलांचा जागतिक सोन्याच्या किमतींवर आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारांवर थेट परिणाम होऊ शकतो.

भारत आणि सोने: एका राष्ट्राचे वेड
चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा उपभोक्ता देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील सोन्याची मागणी ही त्याच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वामुळे प्रेरित आहे. कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या सोन्याची देवाणघेवाण होते आणि लग्न व इतर समारंभांमध्ये भेटवस्तू देण्यासाठी सोने खरेदी केले जाते.

सुवर्णाची रासायनिक माहिती:
संकेत (Au), परमाणुसंख्या 79,
परमाणुभार 196.97, गलनांक (Melting point) 106° से.,
क्वथनांक 2970° से. घनत्व 19.3 ग्राम प्रति घन सेमी,
परमाणु व्यास 2.9 एंग्स्ट्राम A°, आयनीकरण विभव 9.2 इवों,
विद्युत प्रतिरोधकता 2.19 माइक्रोओहम्‌ – सेमी.

स्वर्ण वायुमंडल ऑक्सीजन द्वारा प्रभावित होत नाही. विद्युत्‌वाहक-बल-शृंखला (electromotive series) मध्ये स्वर्णचे सर्वात निम्न स्थान आहे.

स्वर्ण नाइट्रिक, सल्फ्यूरिक अथवा हाइड्रोक्लोरिक अम्ल ने प्रभावित होत नाही परंतु अम्लराज (Aqua regia) [3 भाग सांद्र हाइड्रोक्लोरिक अम्ल तसेच 1 भाग सांद्र नाइट्रिक अम्लाचे सम्मिश्रण], सांद्र= concentrated ) मध्ये विरघळून क्लोरोऑरिक अम्ल (H Au Cl4) बनविते.

संदर्भ:
सोने मराठी विकिपेडिया
सोने मराठी विश्वकोश : ठाकूर अ.ना.
Schmidbauer, H. Gold Chemistry, Biochemistry and Technology, 1999.
Gajda, G. Gold Refining, 1980.
संस्कृत संदर्भ ग्रंथ: चरकसंहिता
फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
तारीख: २१.०६.२०२६

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 122 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..