नवीन लेखन...

पंचवीस वर्षाने रेकॉर्ड झालेले गाणे

प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत. म्हणून ते तुरुंगात गेले व मजरूह ना खोटेच सांगितले की मला एक गाणे हवे आहे . ते गाणे वापरणार नव्हते कारण त्यांचे स्वताचे गीतकार शैलेन्द्र व हसरत जयपुरी होते. मजरूह यांनी गाणे लिहून दिले . राजने त्याना एक हजार रुपये दिले. मजरूहना सवय होती की आपण लिहिलेली गाणी डायरीत लिहून ठेवायची . राजकपूर ते गाणे विसरून गेला. पुढे राजकपूर नी धरम  करम सिनेमा काढला. त्याची गाणी लिहायला मजरूह ना सांगितले . त्या चित्रपटातील गाणी लिहिताना त्यांना १९५१ च्या तुरुंगातल्या गाण्याची आठवण झाली त्यांनी राजला विचारलं “  मी तुरुंगात असताना एक गाणे लिहून दिले होते ते वापरले का ?” राजने सांगितले की नाही मजरूह म्हणाले माझ्याकडे ते गाणे आहे  ते वापरू या

ते गाणे होते

इक दिन बिक जायेगा माटी मोल जग मे रह जायेन्गे प्यारे तेरे बोल

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 115 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..