प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत. म्हणून ते तुरुंगात गेले व मजरूह ना खोटेच सांगितले की मला एक गाणे हवे आहे . ते गाणे वापरणार नव्हते कारण त्यांचे स्वताचे गीतकार शैलेन्द्र व हसरत जयपुरी होते. मजरूह यांनी गाणे लिहून दिले . राजने त्याना एक हजार रुपये दिले. मजरूहना सवय होती की आपण लिहिलेली गाणी डायरीत लिहून ठेवायची . राजकपूर ते गाणे विसरून गेला. पुढे राजकपूर नी धरम करम सिनेमा काढला. त्याची गाणी लिहायला मजरूह ना सांगितले . त्या चित्रपटातील गाणी लिहिताना त्यांना १९५१ च्या तुरुंगातल्या गाण्याची आठवण झाली त्यांनी राजला विचारलं “ मी तुरुंगात असताना एक गाणे लिहून दिले होते ते वापरले का ?” राजने सांगितले की नाही मजरूह म्हणाले माझ्याकडे ते गाणे आहे ते वापरू या
ते गाणे होते
इक दिन बिक जायेगा माटी मोल जग मे रह जायेन्गे प्यारे तेरे बोल


Leave a Reply