नवीन लेखन...

ओळख मूलांकांची : मूलांक १

मूलांक म्हणजे काय?
मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज करून मिळणारा एकच अंक (१ ते ९), जो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा आणि जीवनातील प्रमुख गुणांचा आरसा असतो; हा अंक तुमच्या जन्माच्या तारखेवरून (उदा. ५,१४,२३ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ५) काढला जातो आणि अंकशास्त्रात (न्यूमेरॉलॉजीमध्ये) तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

मूलांक कसा काढायचा?
तुमचा जन्म ज्या तारखेला झाला, ती तारीख (१ ते ३१) मूलांक असते.
जर तारीख दोन अंकी असेल, तर त्या अंकांची बेरीज करून एकच अंक मिळवावा.
उदाहरण
जर तुमचा जन्म ५ तारखेला झाला, तर तुमचा मूलांक ५ आहे.
जर तुमचा जन्म १४ तारखेला झाला, तर १ + ४ = ५, म्हणून मूलांक ५.
जर तुमचा जन्म २३ तारखेला झाला, तर २ + ३ = ५, म्हणून मूलांक ५.
महत्त्व
हा अंक तुमच्या मूळ स्वभावाचे आणि जीवनातील उद्दिष्टांचे दर्शन घडवतो.

आपण ह्या लेखात एक मूलांक असणाऱ्या व्यक्तींची माहिती पाहूया –

मूलांक १ (Mulank1) म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या १, १०, १९, किंवा २८ तारखेला होतो, असे लोक. अंकशास्त्रानुसार, मूलांक १ चा स्वामी सूर्यदेव आहे, त्यामुळे या व्यक्तींमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, तेज, धाडस आणि जबाबदारीची भावना असते; ते राजासारखे जीवन जगतात आणि सूर्यदेवाच्या कृपेने बुद्धिमान व श्रीमंत असू शकतात. या अंकांमध्ये भरपूर ऊर्जा, सामर्थ्य आणि सकारात्मकता आहे.

मूलांक १ ची वैशिष्ट्ये:
स्वामी ग्रह सूर्य (Sun).
जन्म तारीख १, १०, १९, २८.
स्वभाव:
मूलांक १ स्वातंत्र्य, नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास अगदी भरभरून असलेले हे लोकं सूर्याच्या प्रभावाखाली असतात. आव्हाने स्वीकारणे म्हणजे यांचा छंदच! आयुष्यात यश मिळवण्यासाठी धडपड करत असतात. त्यांची प्रेमजीवन प्रगल्भ आणि संघर्षशील असते, कारण त्यांना सहसा त्यांच्या जोडीदाराकडून आदर आणि समर्पणाची अपेक्षा असते. मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींशी यांची जोडी छान जमते. स्वरूप मूलांक १ चे स्वरूप सरळ रेषा आहे. सरळ रेषा हे सशक्त आणि सुदृढतेचे प्रतिक. मूलांक १ च्या व्यक्ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असतात. सूर्यासारख्या तेजस्वी असतात. सहज आकर्षण शक्ती यांच्यात दिसते.

तेजस्वी, आत्मविश्वासी, धाडसी.
नेतृत्व क्षमता आणि जबाबदारीची जाणीव.
बुद्धिमान आणि राजेशाही थाटात जगणारे.
सूर्यदेवाच्या प्रभावामुळे धनवान आणि यशस्वी होण्याची शक्यता.
प्रेम आणि मैत्री मूलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी योग्य जोडीदार आणि मित्र निवडण्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
अंकशास्त्र ज्यांना कुंडली माहीत नाही त्यांच्यासाठी मूलांक उपयुक्त ठरतो. या लोकांमध्ये हे गुण असतात.

सर्जनशील:
हे लोक खूप सर्जनशील, जे लोक करिअरवर लक्ष केंद्रित करतात, ते खंबीर, स्वावलंबी, मेहनती असतात आणि जीवनात नेहमी स्पष्टता असते. स्वभाव व्यावहारिक, मिळूनमिसळून वागणे असा यांचा स्वभाव आहे. पण सगळ्यांशीच ते असं वागत नाहीत. नेहमीच उत्साही असल्याने आजूबाजूचं वातावरणही उत्साही ठेवतात. व्यक्तिमत्त्व दूरदर्शी आणि सुहृदयी असतात. सार्वजनिक कार्यात मग ते रंगमंच असो वा राजकारण, आपली विशेष छाप सोडण्यात यशस्वी होतात. जितके सामाजिक तितकेच कौटुंबिकही असतात. उच्च विचार, प्रबळ इच्छाशक्ती, कृतज्ञ, दिलेला शब्द पाळणारे आणि निस्वार्थीपणे सहाय्य करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

गुण नेतृत्त्व गुण यांना सूर्यानेच प्रदान केलेला आहे. सतत प्रगतीशील असतात. कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी पुढे जाण्याचाच सतत विचार करतात. परिणामांचा प्रथम विचार करून मग कृती करतात. प्रचंड आत्मविश्वासू असतात शक्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचा स्वामी सूर्य असल्या कारणाने हे लोक इतरांना फार हवेहवेसे वाटतात. यांचे विचार नेहमीच प्रगल्भ असतात. तसेच, आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करतात. त्यामुळे यांचं इतरांकडून नेहमी कौतुक होत असतं. राजासारखं आयुष्य जगतात मूलांक १ असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्याचप्रमाणे या जन्मतारखेचे लोक फार सूर्याच्या प्रकाशासारखेच तेजस्वी असतात. सूर्य ग्रह असल्यामुळे आपसूकच यांच्यात राजसी गुण येतो. तसेच, या जन्मतारखेचे लोक राजकारणात फार सक्रिय असतात. यांची लाईफस्टाईल देखील इतरांपेक्षा थोडी हटके असते.

अवगुण कधी रुक्ष स्वभाव आणि कटु भाषेचा प्रयोग केल्याने या व्यक्ती मैत्रीपूर्ण संबंध आणि शुभचिंतकांना दुरावतात. फार काळ कोणत्याही गोष्टीबाबत गुप्तता राखू शकत नाहीत. निडरपणा हानिकारक ठरतो.

अहंकारी स्वभाव असतो:
या जन्मतारखेचे लोक फार दृढनिश्चयी असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचा स्वभाव फार हट्टी आणि अहंकारी वाटतो. यामुळेच यांना इतरांचा विरोध सहन होत नाही. तसेच, यांना कधीच यांची हार सहन होत नाही. त्यामुळेच हे लोक इतरांना फार अहंकारी वाटतात.

भाग्यशाली तिथी यांच्यासाठी प्रत्येक महिन्यातील 1,2,10,11,19,20,28,29 या तारखा शुभ आहेत. याशिवाय 7,16 आणि 25 या लाभ देणाऱ्या तारखा आहेत. कोणतेही चांगले कार्य, व्यवहार सुरू करावयाचा असल्यास या तारखांना सुरू करणे शुभ ठरेल. यशप्राप्ती होईल.

भाग्यशाली रंग मूलांक 1 साठी गुलाबी, पिवळा, सोनेरी रंग शुभ आणि यशप्राप्ती देणारे आहेत. तर काळा रंग हानीकारक आहे. मात्र काळ्या रंगाऐवजी गडद राखाडी रंगाचा वापर करू शकता. निळा रंग मानसिक कष्ट देणारा आहे. पांढऱ्या रंगाऐवजी दुधी रंग (क्रीम) लाभदायक ठरेल.

भाग्यशाली वर्ष या व्यक्तींच्या आयुष्यातील वय वर्षे 7,16,25 शुभ आहेत. शिवाय १०,११, १९,२०, २८,२९,३७, ३८, ४६,४७, ५५,५६ हे वर्ष विशेष लाभदायी ठरू शकतात. तर ८,९,४१,२६,२७,३०,४४,४५,५३ व ५४ वे वर्ष समस्या आणि कष्टदायक असू शकते.

शुभ रत्न या मूलांकासाठी माणिक रत्न शुभ आहे. ५ कॅरेटपेक्षा अधिक वजनाच्या सोने किंवा तांब्यातील या रत्नास रिंग फिंगरमध्ये धारण करावे.

कल्याणकारी मंत्र सूर्य मंत्राचा नित्य जप करावा. सूर्यास नियमित जल अर्पण करा. कीर्ती वाढेल.

मंत्र ॐ ह्वीं घृणि सूर्याय आदित्य श्रीं ।

करियर कसे असते?
ते खूप मेहनती आहेत आणि ते जे काही करतात त्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. ते एक चांगले राजकारणी, नेता आणि सरकारी खात्याचा अधिकारी बनू शकतात. एक चांगला व्यापारीदेखील बनू शकतात. मूलांक १ असलेल्या लोकांनी कोणाशी मैत्री, प्रेम आणि लग्न करावे म्हणजे मुळांक एक असलेल्या लोकांसाठी कोणत्या मूळांकाचा जोडीदार भाग्यशाली राहतो मूलांक एकचे जातक अत्यंत तर्कशाली आणि स्वतंत्र विचारांचे असतात परंतु तरीही हे केअरिंग आणि कोमल हृदयाचे असतात. या लोकांनी मूलांक ८ मूलांक ७ आणि मूलांक ५, असलेल्या लोकांशी मैत्री, प्रेम आणि लग्न करावे. मूलांक एकचे जातक घाईगडबड करणारे आणि फास्ट असतात यामुळे यांना अशा जोडीदार आणि मित्राची आवश्यकता असते जे यांना समजूतदारपणे साथ देतील आणि स्वतः धैर्यशाली असतील.

मूलांक १ असलेल्यांसाठी कसं असेल नवं वर्ष २०२६?
मूलांक १ अंतर्गत जन्मलेल्या लोकांसाठी, २०२६ हे वर्ष आरोग्य, मनोबल, संपत्ती, धैर्य, आनंद, मुले, अभ्यास, वैवाहिक जीवन, नोकरी आणि व्यवसायात काही नवीन आणि विशेष बदल घेऊन येईल. अशा लोकांच्या आयुष्यात २०२६ मध्ये काही सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतील.

तर या वर्षी १ मूलांक असलेल्या लोकांमध्ये नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा दिसून येईल. तुमच्या कामाचा ताण असला तरीही तुमचे आरोग्य अनुकूल राहील. पण, असंतुलित आहारामुळे पोटात गॅस, मूळव्याध आणि रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. म्हणून, तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने शुभ राहतील.

मूलांक एक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष अचानक यश आणि आर्थिक लाभाचे तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचे वर्ष ठरू शकते. हे वर्ष अभ्यास, पदवी आणि मुलांच्या बाबतीत मोठे यश मिळवून देईल. तुमच्या अभ्यासातील आणि अध्यापनातील अडथळे दूर होतील. कठोर परिश्रमाने तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये, विशेषतः प्रशासकीय सेवांमध्ये यशस्वी होऊ शकता.

हे वर्ष वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांसाठी मध्यम यश घेऊन येईल. प्रगती आणि बदलासोबतच, तुमच्या वागण्यात तीव्रता आणि कठोरता देखील वाढलेली दिसून येईल. त्यामुळे आयुष्यातील मधुरता कमी होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल सामान्य चिंता वाटू शकते. तुमच्या प्रेमसंबंधात अचानक संघर्ष किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, जपून रहा.

(डिस्क्लेमर वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा ९८८१२०४९०४
०८.०१.२०२६

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 107 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on ओळख मूलांकांची : मूलांक १

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..