नवीन लेखन...

ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३

अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो. […]

विश्वकर्मा शिल्पकार: आरंभिक इतिहास कालखंड

बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली. […]

अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत. […]

बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ

मराठीत सुंठीवाचुन खोकला गेला अशी एक म्हण आहे. यातच सुंठीचे व्यवहारातील औषधी महत्व अधोरिखित होते. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. […]

ओळख मूलांकांची : मूलांक २

मूलांक २                         मूलांक २ (जन्म २, ११, २०, २९ तारखेला) असलेले लोक शांत, संवेदनशील, बुद्धिमान आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात, जे चंद्रदेवाच्या प्रभावाखाली असतात; ते मनाने सुंदर असून इतरांकडे लवकर आकर्षित होतात, पण आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, म्हणून त्यांना प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची गरज असते. हे […]

महाकाव्यकालीन विश्वकर्मा शिल्पकार

ज्या कालखंडात रामायण व महाभारत प्रथम लिहिल्या गेले त्या कालखंडातील विश्वकर्मा समाजाचा विचार या प्रकरणात केला आहे. हा कालखंड नक्कीच वैदिक काळाच्या नंतरचा पण बुध्दपूर्व आहे यात शंका नाही. कांही इतिहास तंज्ज्ञांनी इ.स. पूर्व १५०० नंतरचा काळ उत्तर वैदिक काळ मानला आहे. परंतु याच कालखंडात घडलेले रामायण आणि महाभारत नेमके कोणत्या वर्षात घडले या विषयी एक वाक्यता नाही. तसेच ही दोन्ही महाकाव्ये कधी लिहिल्या गेलीत या विषयी सुद्धा एकमत दिसत नाही. तरी या अध्यायात उपलब्ध ग्रांथिक पुराव्यावरुन इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० या ९०० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. […]

बलात्कार

बलात्कारावर कविता लिहावी अशी इच्छा नसते… पण… रोज येणारी एक नवीन बलात्काराची बातमी कित्येक विचारी पुरुषांचा मेंदू सुन्न करणारी असते… आतापर्यंत फक्त स्त्रियांवर बलात्कार होत होता, पण हल्ली स्त्री-लिंगावरही बलात्कार होऊ लागला आहे. माणसाच्या या जगात आता स्त्री-लिंगही सुरक्षित नाही. आता एका वासनांध पुरुषाच्या बलात्काराची शिकार एक कुत्रीही ठरली आहे. ज्या पेशात आता बलात्कारी पुरुष नाही, […]

‘फेब्रुवारी’चे फर्जंद

‘फेब्रुवारी’ मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘सृजनशील, प्रामाणिक, शांत व द्रष्टया’ मानल्या जातात. चालू ‘फेब्रुवारी’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय व मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..