नवीन लेखन...

देवाची करणी

… देवाची करणी… नारळात भरलं पाणी तुझीच रे करणी आभाळाला नाव तुझं देवा.. तुझीच रे धरणी..!! दिवे लाखो चांदण्याचे चंद्र तुझा लामणदिवा उजेडाच्या दुलईवर खेळ खेळतसे हवा.. चुलीतली आग भरी पोट कशी नेतोस रे तरी सरणी..!! जग पाखरांचे वेडे फुलपाखरू कोषातून घडे.. पाण्यातल्या माशांना देतो पोहण्याचे कोण धडे.. जोंधळ्याचे भरले गोंडे.. उसात कशी साखरेची केली पेरणी..!! […]

शेतकऱ्यांचा धावा

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास  यांनी लिहिलेली ही कविता नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा बरसणार कारे सुखाचा यंदा ।। भिजले कारे काळी माती होतील कारे तडे हद्दपार उगवतील कारे टपोरे मोती बनेल शिवार हिरवे गार नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…।। १ ।। देशील […]

आनंदाचा पारिजातक

छोट्या छोट्या अशा क्षणांतील मजा चाखता जगता यावे पार नसलेल्या आनंदालाही मग इवल्याशा मुठीत मावता यावे थकून सायंकाळी घरी आल्यावर प्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीने चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे जीवन उरवणाऱ्या क्षणांना धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे जीवनाशी नाळ अजून अबाधित […]

मुलांचं विश्व

आमच्यासाठी घर हेच आमचं संपूर्ण विश्व होतं विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग आमचंच घर कसं दिसत नाही आसूसून यांच्यासाठी आम्ही किती जमवले आनंदाचे कवडसे नाही खिजगणतीतही त्यांच्या आम्ही किंवा आमचे उसासे उमेद होती तेव्हा कशाकशाची तमा नाही बाळगली श्रमाची उमजत नाही बाळगावी का उमेदही यांच्या तारतम्याची केवढा ध्यास आम्हाला, यांचे हात लागावेत गगनाला पाय तरी ठरतील जमिनीत […]

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही. […]

शेत मजूर

मुळ डच कवि आद्रियान रोनाल्ड होल्स्ट यांच्या या कवितेचा मराठी अनुवाद केलाय विजय नगरकर यांनी. […]

मैं ख़याल हूँ किसी और का ….. (ग़ज़लचा रसास्वाद)

‘मैं ख़याल हूँ किसी और का … ’ ही गझल मेहदी हसन यांनी ( व इतर प्रसिद्ध गायकांनीही) गाइलेली व सलीम कौसर या पाकिस्तानी ग़ज़लगोनें (गझलकार) लिहिलेली आहे. (मेहदी हसन यांनी आपल्या गायनाच्या आधी या गझलगोचा उल्लेख केलेला आहे). […]

निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय. […]

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

Image © Prakash Pitkar…. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा … हिरकणी बुरुजावरून दिसणारं … मराठी मुलुखाचं विहंगम दृष्य पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं […]

वासंतिक झुळूक ….. फुलोरा

हैदराबादच्या आमच्या घराजवळच एक छोटीशी टेकडी आहे. त्यावर एक लहानसं गार्डन आहे. आम्ही रोज सकाळी इथे चालायला जातो. आज जरा अंमळ लवकरच गेलो. साडे सहाच्या थोडसं अगोदरच. वातावरण अति प्रसन्न होतेच पण आजचा सकाळचा वारा काही वेगळाच होता. त्यात असा एक सुखद गारवा होता की जो अंतर्मनाला फार सुंदर स्पर्श करत होता. एक तास झाला पण […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..