नवीन लेखन...
राजेश जगताप
About राजेश जगताप
मी एक नवोदित लेखक आहे. माझ्या कथा नियमितपणे "बोलती पुस्तके by Patil sir" या युट्यूब चॅनल वर ऑडिओ स्वरूपात सादर केल्या जातात.. माझे " विळखा The Trap " आणि " आनंदी " हे दोन कथासंग्रह प्रस्तावित आहेत.

बापाची जागा

अरे माझी माय .. माझी माय .. म्हणून सगळेच बोंबलतात बाप तुमचा मेलाय काय…? आईनं जन्म दिला आईनं वाढवलं बापाचं योगदान काहीच नाही काय ? रडत होती पण लढत होती बरंच सोसावं लागलंय तिला बापाचा हात पाठीवर होता म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.! आईच्या डोळ्यातलं पाणी आणि दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात अरे दिसले नाही कधी […]

सावज (कथा)

सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले.. […]

देवाची करणी

… देवाची करणी… नारळात भरलं पाणी तुझीच रे करणी आभाळाला नाव तुझं देवा.. तुझीच रे धरणी..!! दिवे लाखो चांदण्याचे चंद्र तुझा लामणदिवा उजेडाच्या दुलईवर खेळ खेळतसे हवा.. चुलीतली आग भरी पोट कशी नेतोस रे तरी सरणी..!! जग पाखरांचे वेडे फुलपाखरू कोषातून घडे.. पाण्यातल्या माशांना देतो पोहण्याचे कोण धडे.. जोंधळ्याचे भरले गोंडे.. उसात कशी साखरेची केली पेरणी..!! […]

कॉन्ट्रॅक्ट (कथा)

सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं.. […]

आनंदी

आये…वासुदेव आलाय गं…म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता.. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..