तिचं मा़झं प्रेमप्रकरण जेव्हा
तिच्या घरी माहित पडलं
बोलणं भेटणं बंद करून तिनं
मला एक पत्र धाडलं..!!
दारात उभा राहून तिच्या मी
म्हणालो तिला चल राणी येशील का
आठ दिवसांची मुदत मिळालीय
खरंच सांग मला नेशील का…!!
एका विवाहमंडळात डायरीतली
तारीख पाहून मुहुर्त ठरला..
नातेवाईक दोघांचेही नव्हते म्हणून
मामाचा मळवट भटजीनेच भरला..!!
हळद नव्हती मेंदी नव्हती
पाचशेचा शालू शंभराचा चूडा..
जून्या ड्रेसवर मी मुंडावळ्या बांधून
तिथेच उरकला साखरपुडा…!!
दोन चार मित्र मैत्रिणी तिच्या
दोन-चार माझ्याही होत्या..
वरात अशी जंगी निघाली..
करवल्या मात्र कुठेच नव्हत्या…!!
थम्पस्अप आणि वेफर्सची
पंगत शेवटी बसली होती..
पेढ्याचा घास घेऊन डोळे पुसता पुसता
ती माझ्यासाठी हसली होती…!!
….. राजेश जगताप..
मुंबई ९८२१४३५१२९


Leave a Reply