नवीन लेखन...

कसोटीतील सर्वात अनुभवी पंच स्टीव्ह बकनर

स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे. […]

आंतरराष्ट्रीय पंच रोशन महानामा

रोशन महानामा यांनी १९९७-९८ मध्ये कोलंबो येथे सनथ जयसूर्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५७६ धावांची भागीदारी रचली. कसोटीत आजही हा विक्रम कायम आहे. दोन दिवस फलंदाजी करणारी ही पहिली जोडी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेने ६ बाद ९५२ धावा केल्या. हाही एक विक्रम ठरला होता. […]

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. […]

अभिनेते संजय खापरे

संजय खापरे यांनी आपल्या रुपेरी पडद्यावरील वाटचाल महेश मांजरेकर यांच्या ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या हिंदी चित्रपटापासून सुरु केली. त्यानंतर खापरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रॉकी हॅण्डसम या चित्रपटातही काम केले. आपल्या कारकिर्दीत संजय खापरे यांनी जत्रा, गाढवाचं लग्न, टाटा बिर्ला आणि लैला, अजब लग्नाची गजब गोष्ट, अग्निपरिक्षा, भाऊचा धक्का, काकस्पर्श, फक्ता लढ म्हणा, प्रियतमा, लयभारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वॉण्टेड बायको नं 1, मर्डर मेस्त्री, दगडी चाळ, गलबत, डिस्को सन्या, फॅमिली कट्टा, झाला बोभाटा, नगरसेवक, तलाव, मेमरी कार्ड, बे एके बे या चित्रपटातून अभिनय केला आहे. […]

एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणारा पहिला नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे

२९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात ‘आधी’ शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत. […]

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, साहित्यिक ग. प्र. प्रधान

ग.प्र . प्रधान यांनी अनेक वृत्तपत्रातून लिखाण केले. तसेच ते निस्पृह कार्यकर्ता , विचारवंत म्हणून ते समाजात वावरले. ग. प्र . प्रधान यांना ‘ लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक ‘ या पुस्तकासाठी राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. मराठी मध्ये लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक , आगरकर लेख संग्रह , महाराष्ट्राचे शिल्पकार – ना. ग. गोरे . साता उत्तरांची कहाणी , सत्याग्रही गांधीजी , माझी वाटचाल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत , भाकरी आणि स्वातंत्र्य , काजरकोट , सोनार बांगला ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. तर इंग्रजीत लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी , इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल, ऍन एपिक ऑफ सॅक्रिफाइस अँड सफरिंग , लेटर टु टॉलस्टॉय , परस्यूट ऑफ आयडियल्स ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली.. […]

अभिनेते क्लिंट ईस्टवूड

क्लिंट ईस्टवूड यांनी ५ वेळा गोल्डन ग्लोब अवार्ड, ४ वेळा ऑस्कर अवॉर्ड व स्क्रीन एक्टर्स गिल्ड लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड जिंकले आहेत. मिलियन डॉलर बेबी, फॉर अ फ्यू डॉलर्स मोर,द गुड, द बैड एंड द अग्ली, मिस्टीक रिव्हर, ग्रॅन टोरिनो, लेटर्स फ्रॉम आयवो जिमा, चेजेंलिंग, हे क्लिंट ईस्टवूड यांचे गाजलेले चित्रपट आहेत. […]

ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे

उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत. […]

स्वामींची प्रेमळ माया

स्वामींची प्रेमळ माया असेल कृपा छाया, भक्तांना मिळेल सदा मायेचा अथांग ओलावा गजानन महाराजांची कीर्ती करुणाकर प्रेमळ मूर्ती शांत चित्ती भाव मुखी लाभेल कृपा प्रसाद मस्तकी मिळेल निश्चित अनुभूती ठेवावी श्रद्धा अंतकरणी, अक्कलकोट स्वामींची महती शेगाव नगरी पावन ती पंढरी — स्वाती ठोंबरे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

१९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. […]

1 2 3 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..