त्याचे वेगळेपण…
मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत. […]