नवीन लेखन...

जोडावी – भाग ५

संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते … प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते… आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि

यामिनी : प्रतिभा माझ्यासाठी थोडे पाणी घेऊन येतेस का ?

प्रतिभा : हो ! आणते ना ! ( प्रतिभा स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेऊन येते ) घ्या ताई !

यामिनी : थँक्स ! आज खूप थकले आहे. ( पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवते. ) मी जरा फ्रेश होऊन येते तोवर तू चहा गरम कर !

प्रतिभा : हो ! तसाही माझा स्वयंपाक होत आला आहे

यामिनी आत जाऊन फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसते तितक्यात प्रतिभा चहा आणि नाश्ता घेऊन येते ..

यामिनी : साहेब कोठे गेले ?

प्रतिभा : माहीत नाही ! मी आले तेव्हा ते घरी नव्हते !

यामिनी : बरं ! ( दोन चॉकलेट  प्रतिभाच्या हातात देत ) तुझ्या मुलांना दे ! सांग तुमच्या मावशीने दिले आहेत .

प्रतिभा : हो ! सांगते.. थँक्स हा ! ताई…

यामिनी : बरं ! आता तू  आटपून घे ! तुलाही घरी जायला उशीर होईल…

प्रतिभा : ताई ! एक सांगायचे राहूनच गेले मी तुमच्यासाठी तळलेले मासे आणले आहेत फ्रिजमध्ये ठेवले आहेत

यामिनी : काय बोलतेस ! आमचं लग्न झाल्यापासून मी घरचे मासे खाल्लेच नाहीत… विजय बोलला वाटत तुला ! त

प्रतिभा : असाच बोलता बोलता विषय निघाला , ताई तुम्ही काळजी करू नका ! तुम्हाला जेंव्हा कधी मासे खावेसे वाटतील तेंव्हा मला सांगा मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन !

यामिनी : खरच ! मला तुझ्यासारखी बहीण मिळली याचा आज खूपच आनंद होत आहे.

प्रतिभा : ताई ! तुम्ही बसा मी स्वयंपाक आटपून येते…

यामिनी टी. व्ही. सुरु करून टी.व्ही. वर मालिका पाहत बसते.. .थोड्या वेळाने यामिनी तिची कामे आटपून बाहेर येते

यामिनी : कामे आटपली का ?  तू टी.व्ही. पाहतेस की नाही ?

प्रतिभा : पाहते की  ! पण रात्री उशिरा… घरातील सर्व कामे आटपली की …

यामिनी : बर ! तू निघ आता.. चॉकलेट घेतलेस ना सोबत…

प्रतिभा : हो ! ताई मी निघते…

प्रतिभा निघून जाते आणि यामिनी तिची मालिका पाहण्यात गुंग होते… काही वेळाने दारावरची बेल वाजते… यामिनी पुढे होऊन दरवाजा उघडते दारात विजय उभा असतो त्याच्या हात फळांची पिशवी असते… त्याला आत घेत…

यामिनी : हे काय ? इतकी फळे कशाला आणलीस ?

विजय : रस्त्यात येताना दिसली म्हणून आणली…

यामिनी : रस्त्यात एखादी सुंदर बाई दिसली म्हणून तू तिलाही घेऊन येशील..

विजय : इतकं ! माझं नशीब कोठे चांगलं आहे… बरं  ! ही फळे मी धुवून फ्रिजमध्ये ठेवतो…  (तो आत जाऊन फळे फ्रिजमध्ये ठेवतो आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसतो. )

यामिनी : तुला माहीत आहे का ? आज प्रतिभाने माझ्यासाठी तळलेले मासे आणले आहेत…

विजय : मग ! आज तुला दोन घास जास्त जातील नाही !

यामिनी : हो ! नकीच !

विजय : मलाही मासे प्रचंड आवडायचे म्हणजे मी वर्षाचे  बारा महिने मासे खायचो ! मला मासे आवडायचे म्हणून आई माझ्यासाठी दुसऱ्या दिवशीही मासे उरवून ठेवायची…मला मासे आवडतात म्हणून माझी मामीही मासे केल्यावर खास माझ्यासाठी द्यायची मग वार कोणताही असो… पण पुढे मला मांसाहाराचा त्रास होऊ लागला आणि माझे आध्यत्मिक विचारही प्रगल्भ झाले त्यामुळे मी मांसाहार सोडला… मांसाहार न करणे हा माझा माझ्यापुरता घेतलेला निर्णय होता.. इतरांनी तो करू नये असा आग्रह माझा कधीच नसतो ! मी माझ्या मित्रांसोबत आजही एका टेबलावर बसून ते नॉनव्हेज आणि मी व्हेज खातो… तुलाही मी तू घरी मांसाहार करू नकोस ! खाऊ नकोस असे कधीही सांगितले नाही पण तुला तो एकटीसाठी करायलाच त्रास वाटतो हा भाग वेगळा !

यामिनी : पण आता काही त्रास नाही ! प्रतिभा आहे ना ! ती करेल आमच्यासाठी…

विजय : मजा आहे आता तुझी ! पण आम्हाला काय आयुष्य आता घास – फूस खाण्यातच काढावे लागणार…

यामिनी : आजपण पाय मोकळे करायला गेला होतास की काही काम होते… बाहेर …

विजय : माझा एक मित्र ! पुण्याहून मुंबईला आला होता काही कामानिमित्त त्यालाच भेटायला गेलो होतो..

यामिनी  : झाली का भेट !

विजय : हो ! झाली ! तू माघारीही गेला असेल पुण्याला

यामिनी  : मित्र भेटला म्हणजे तू बाहेर काहीबाई खाऊन आलाच असशील ! पण ! प्रतिभाकडून मास्यांचं नाव ऐकताच माझी भूक प्रचंड चालवली आहे .. मी जेऊन घेते तू पाहिजेतर नंतर जेव…

विजय : तू घे ! जेऊन मी नंतर जेवेन…

यामिनी जागेवरून उठते आणि स्वयंपाक घरात जाऊन तेथेच असणाऱ्या टेबल खुर्चीवर जेऊन बाहेर येते तर विजय मालिका पाहत असतो ..

यामिनी : प्रतीभाने मासे काय छान केले होते… खाताना माझा आत्मा अगदी तृप्त झाला…

विजय : हे सांगून तू माझा आत्मा अतृप्त करू नकोस !

यामिनी : बर ! मी आता आत जाऊन पडते ! एक दोन मेल चेक करायचे आहेत ते करते आणि झोपते… तू ही जेव आणि झोप…

विजय : बरं बाईसाहेब ! शुभ रात्री !

यामिनी : शुभ रात्री !

विजय : स्वतःशीच विचार करत … प्रतिभा यायला लागल्यापासून आमच्या घराला खऱ्या अर्थाने घरपण आले… नाहीतर ! आम्ही दोघे यंत्रासारखे जीवन जगत होतो. आता आमच्या जगण्यात थोडा आनंद येऊ पाहत आहे… मला माहीत आहे .. प्रतीभाचेही एकेकाळी माझ्यावर प्रचंड प्रेम होते… तिने ते कधी व्यक्त केले नाही आणि ते मला माहीत आहे मी तिला कधी जाणवू दिले नाही … आज ती तिच्या आयुष्यात जरी जगण्यासाठीचा संघर्ष करत असली तरी सुखी आहे याचा मला आनंदच आहे…खरं तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केलाही असता पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हते… तिच अशिक्षित असणं हे एक मोठं कारण होत मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला… माझ्याकडे स्वतःच असं घरही नव्हतं, माझी स्वप्नेही मला तेव्हा खुणावत होती… यामिनीने खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांना पंख दिली म्हणून मी एक प्रसिद्ध व्यक्ती होऊ शकलो ! नाहीतर ! माझ्या घरच्यांनी नेहमीच माझ्या स्वप्नांचा गळा घोटाळा…त्यावेळी प्रतिभा माझ्या आयुष्याचा भाग झाली असती तर कदाचित तिच्या वाट्याला आज आले आहे त्यापेक्षा कदाचित खडतर जीवन तिच्या वाट्याला आले असते… आज तिच्याकडे हक्काचे घर आहे , हक्काचा नवरा आहे , हक्काचे नातलग आहेत, हक्काची मुले आहेत… आज माझ्याकडे सर्व काही आहे असे जगाला वाटत असले तरी… हे जे काही आहे ते यामिनीचे आहे तिच्या कष्टाचे आहे ! मी आयुष्यात फक्त नाव, पद , प्रतिष्ठा, मान – सन्मान मिळवला ! पण त्याने कधीच कोणाचे पोट भरत नाही ! त्यासाठी पैसाच लागतो. तो कालही लागत होता आणि आजही लागतो…. माझ्या कुटुंबाने माझ्यातील प्रतिभेचा नेहमीच अपमान केला त्यामुळे मी प्रतिभाला माझ्या आयुष्याचा भाग करू शकत नव्हतो… प्रतिभाच्या डोळ्यात त्यावेळी माझ्यासाठी जी प्रेमातुरता होती ती मला माझ्याबद्दल कधी यामिनीच्या डोळ्यातही दिसली नाही ! यामिनी आणि माझे प्रेम हे प्रौढ प्रेम होते… आम्ही प्रेमात पडलो ते वय प्रेमात वाहवत जाण्याचे नव्हते.. आम्ही दोघे एकमेकांना पूरक होतो… पण आम्ही नक्कीच आदर्श म्हणावे असे प्रेमी ! कधीच नव्हतो… यामिनीच्या मनात माझ्यातील प्रतिभेबद्दल आदर आहे प्रेम आहे… म्हणूनच ती माझ्या आयुष्याचा आज भाग आहे… प्रतिभाला तर माझ्यातील प्रतिभेची कल्पनाच नव्हती आणि तिला त्याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते कारण कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत आयुष्य काढण्याची तिची मानसिक तयारी होती.. कारण तिने जी परिस्थिती भोगली होती त्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती तिच्या वाट्याला येणार नव्हती.. पण मला माझ्यामुळे कोणाच्या आयुष्याची झालेली फरफड सहन होणारी नव्हती… यामिनीने माझ्या आयुष्याला स्थेर्य दिले कारण कोणाच्याही आयुष्याला स्थेर्य दयायला लागणारा पैसा तिच्याकडे होता… आज तो माझ्याकडेही आहे पण… यामिनीच्या… उपकारामुळेच… ( विजय त्याचे पाणावलेले डोळे पुसून सोफ्याचा बेड करतो आणि लाईट बंद करून झोपी जातो…  )

 

 

 

 

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..