नवीन लेखन...

ग्लोबलायझेशन गणेशोत्सवाचे

लोकमान्य टिळकांनी ११६ वर्षापूर्वी ज्या उद्देशासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आज किती गणेशोत्सव पार पाडतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. बहुतांशी गणेशोत्सव या मुळ तत्वापासून दूर गेले असेल तरी आज ही काही गणेशोत्सव या मुळ उद्देशापासून दूर गेलेले नाहीत. अशा गणेशोत्सवांना त्याचे सोयरसुतकही नाही. जे गणेशोत्सव गडगंज श्रीमंत आहेत ते असं म्हणू लागले आहेत की, आता तर गणेशोत्सवांचेही ग्लोबलायझेशन झालं आहे. मग तुम्ही मागे का? एवढ्यावरच ते थांबत नाहीत अशा गणेशोत्सवांना ते मागासलेले आहेत असे हिणवून एक चेष्टेचा विषय केला आहे.

आज असे अनेक नागरिक आहेत ते स्वतः आपआपल्या विभागातील गणेशोत्सवाचे कार्यकर्ते असतील. कदाचित कार्येकते नसले तरी त्यांनी ते गणेशोत्सव फार जवळून पाहिले असतील. त्या वेळच्या गणेशोत्सवाची वर्गणी मागणारे कार्यकर्ते घरोघरी जावून वर्गणी मागत नागरिक अथवा दुकांनामध्ये जावून वर्गणी मागणे व प्रसंगी वसुलीसाठी हुज्जत घालणे, त्या भांडणातही एक प्रेम होत. तसेच नागरिक स्वेच्छेने जेवढी वर्गणी द्यायचे ती वर्गणी चुपचाप स्वीकारत होते.

कलांतराने त्यात थोडा बदल झाला वर्गणीच्या नावाखाली खंडणी सदृष्य प्रसंग घडू लागले. त्यामागे प्रतिमातरी अशी होती की, केवळ याच वर्णणीतून हे सर्व गणेशोत्सव साजरे होतात. ह्ळू-हळू तो ही प्रकार मागे पडू लागला आणि आता एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. या नविन युगात वर्गणीची जागा एका वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठेने महत्व वाढेल. या बदलाला एक गोंडस नाव दिले गेले ते म्हणजे माकटींग या मार्केटींगच्या नावाखाली जाहीरातीचे महत्व वाढत गेले. ज्या गणेशोत्सवात डिजे वाजतो, ज्या गणेशोत्सवात मोठ-मोठ्या ‘सेलीब्रिटीज* उपस्थित राहतात तो मोठा गणेशोत्सव अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे वृत्तपत्रातील जाहीराती अशा विविध माध्यमातील जाहीरातींबरोबर होर्डींग व आऊटडोअर अँडव्हटींयझिंगचे महत्व वाढले. जाहीरात माध्यमातून अमाप पैसा मंडळांना मिळू लागल्याने वर्गणी ही “कन्सेप्ट? बंद पडू लागली. गणेशोत्सव हे स्वस्तात, कमी वेळेत व अत्यंत प्रभावी असे जाहीरातीचे माध्यम बनत असून या बदलामुळे उत्सवाचे अर्थकारणच बदलत आहे.

ते इतक बदलू लागलय की, एखाद्या गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आपल्या दारात वर्गणी मागण्यास येत नाही याचेही आश्चर्य वाटत नाही, आणि कार्यकर्ते ही असे समजू लागलेत की, गणेशोत्सवाच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या कमानीवर मांडवाच्या रनिंग लाईटवर जाहिराती लावल्याने मंडळांना एवढे उत्पन्न मिळते की, वर्गणीची आवश्यकता काय?

अनेक मंडळांनी आपल्या कामाची एक *स्ट्रटीजी* अशी केली की, लोकांकडून वर्गणी मागायचीच नाही. मंडळाचा अहवाल किंवा स्मरणिका पानांवर जाहीराती मिळवायच्या एका पानावर कार्यकर्त्यांची नावे छापायची आणखी एक दोन पानांवर मंडळाच्या गतसालचा जमाखर्च छापला की झाले. त्यातून हजारो ते लाखो रुपये मिळविले हे साधन झाले आहे.

जसे गणेशोत्सव हे पैसे मिळविण्याचे साधन झाले तसेच अशा गणेशोत्सवामुळे भावी काळातील स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार घडविण्याची “फॅक्टरी? झाली आहे. अशा उत्सवामधूनच स्वतःचे “प्रोजेक्शन? करुन घेण्याची संधी दवडू द्यायची नाही तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी स्वत:च अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी अशा गणेशोत्सवांचा उपयोग फार खूबीन करुन घेतात तेथे आपल्या नेत्यापेक्षा मोठा फोटो होडींगवर किंवा गेटवर लावून या विभागात केवळ मीव एकमेव लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहे हे दाखविण्याची चढाओढ सुरु असते.

जाहीरातीतून भरमसाठ मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर भव्य दिव्य आरास, लखलखणाऱ्या दिव्याची रोषणाई यामुळे आपल्या गणेशाची किर्ती सातासमुद्रापलीकडे पोहचविण्याचे काम सर्व दूरदर्शन वाहिन्या मोठ्या शिताफीने करु लागलेत. उत्सवाचे प्रक्षेपण करत असताना दूरचित्रवाणी संस्थामधील मार्केटिग विभागाच एक्झिक्युटीव्ह ज्या कुशलतेने स्पेस विकतात ते खरोखर वाखणण्यासारखे असते म्हणून आपण म्हणू लागली होय आमचा गणपती ग्लोबलाईझ झालाय. त्यासाठी लोकमान्य टिकांच्या उद्देशाचा चक्काचूर झाला तरी चालेल. पण नाही जसे सुरवातीला सांगितले तसे की आजही काही गणेशोत्सव असे आहेत की खरोखरच लोकमान्य टिळकांच्या उद्देशाशी एकनिष्ठ आहेत. हे पाहिल्यावर खरोखर अस वाटत, ही अजूनही आशा आहे. “यस्‌ देअर इज होप?

– विद्याधर ठाणेकर
गांवकरी २३ सप्टेंबर २००७

Avatar
About विद्याधर ठाणेकर 2 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..