नवीन लेखन...

व्हिएतनाम : इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ

दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देश पर्यटनासाठी लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी व्हिएतनाम हा देश विशेष वेगळेपण घेऊन उभा आहे. येथे एकीकडे हिरवीगार भातशेती, उंचसखल डोंगररांगा, मोहक समुद्रकिनारे तर दुसरीकडे आधुनिक शहरे, गजबजलेली बाजारपेठ आणि रंगीबेरंगी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतीय प्रवाशांसाठी व्हिएतनाम हा तुलनेने किफायतशीर, जवळचा आणि सहज व्हिसा मिळणारा देश असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

 

व्हिएतनामचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा

व्हिएतनामचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. चिनी, फ्रेंच आणि अमेरिकन आक्रमणांनी या देशाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी आपली संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान टिकवून ठेवला.

चिनी प्रभाव (इ.स.पूर्व १११ ते इ.स. ९३८) हा जवळपास १००० वर्षे असल्यामुळे  व्हिएतनामी समाजात चिनी संस्कृती, लेखनप्रणाली आणि धार्मिक परंपरा यांचा खोलवर परिणाम दिसतो. चिनी प्रभाव इथल्या  वास्तुशास्त्र, मंदिरे आणि लेखनपद्धतीत स्पष्ट दिसतो.

स्वातंत्र्य व स्थानिक राजवंशे हि ९३८ ते १८५८ह्या ९०० वर्षाच्या काळात  स्थानिक राजवंशांनी राष्ट्र उभारणी केली. ह्याच काळात बौद्ध व कॉन्फ्युशियन विचारांचा प्रसार झाला.

फ्रेंच वसाहतकाल हा १८५८ ते १९५४ ह्या शंभर वर्ष काळात होता आणि त्यामुळेच  पॅरिससारख्या वास्तुकलेची झलक आजही हनोई आणि हो ची मिन्ह सिटीमध्ये दिसते – त्या  काळातील बांधकाम शैली,  चर्च आणि कॅफे संस्कृतीमध्ये जाणवतो.

अमेरिका-विरोधी युद्ध जे १९५५ ते १९७५ असा प्रदीर्घ काळ चालले ,  या युद्धामुळे जगभरात व्हिएतनामचे नाव गाजले. आज युद्धसंग्रहालये आणि स्मारके  आणि बोगदे (Củ Chi Tunnels)त्या इतिहासाची आठवण करून देतात आणि आजही पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात.

साधारण १९७५ ला युद्ध संपल्यापासून इथे प्रगती सुरु झाली.  आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरणामुळे व्हिएतनाम आता पर्यटन, व्यापार व सांस्कृतिक आदानप्रदान यासाठी अग्रगण्य बनले आहे.

भौगोलिक रचना

व्हिएतनाम हा दक्षिण-पूर्व आशियातील एक लांबट व अरुंद देश आहे. देशाचा आकार “S” सारखा दिसतो. एकूण लांबी सुमारे १,६५० किमी आहे, पण रुंदी काही ठिकाणी फक्त ५० किमी इतकीच आहे. यामुळेच उत्तर ते दक्षिण व्हिएतनाममध्ये हवामान, शेती व संस्कृती यामध्ये मोठी विविधता दिसते. उत्तरेला चीन, पश्चिमेला लाओस आणि कंबोडिया, तर पूर्वेला दक्षिण चीन समुद्र आहे. उत्तरेत प्रामुख्याने  उंच डोंगर व थंड हवामान, मध्यभागात समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा आणि दक्षिणेकडे नद्या, डेल्टा प्रदेश आणि महानगर. ही  भौगोलिक विविधता प्रवासाला नवा रंग देते. व्हिएतनामची किनारपट्टी सुमारे ३,२०० किमी लांब आहे.

व्हिएतनामला तीन मुख्य भागांत विभागता येते:
उत्तर व्हिएतनाम येथे उंच डोंगर, टेकड्या आणि नद्यांचा संगम आहे, रेड रिव्हर डेल्टा हा सुपीक प्रदेश आहे आणि सापा, हा जड डोंगराळ भाग, तांदळाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.

मध्य व्हिएतनाम , हा भाग अरुंद आहे आणि डोंगर एकीकडे तर समुद्रकिनारे दुसरीकडे दिसतात. येथे अनामाइट पर्वतरांग (Annamite Range) आहे. या प्रदेशात ह्युए, दा नांग, होई आन अशी महत्त्वाची शहरे आहेत.

दक्षिण व्हिएतनाम, येथे मेकाँग नदीचे डेल्टा पसरलेले आहे. सुपीक माती व भरपूर नद्या असल्याने शेतीसाठी आदर्श.  हो ची मिन्ह सिटी, ना त्रांग, फू क्वॉक बेट या भागात आहेत.

दोन प्रमुख नद्या येथे आहेत रेड रिव्हर (Song Hong) – उत्तर भागात हनोईतून वाहणारी आणि मेकाँग नदी – दक्षिणेत सुपीक डेल्टा निर्माण करणारी. या नद्यांमुळे देश शेतीप्रधान राहिला आहे.

प्रमुख पर्यटनस्थळे
हनोई  ही व्हिएतनामची राजधानी असून जुन्या आणि नव्या संस्कृतीचा मिलाफ येथे पाहायला मिळतो.

HaNoi Old Quater

————————————————————————————-
Hanoi Opera House

—————————————————————————————
Hanoi Water Puppet Show)

महत्वाची ठिकाणे होअन कीएम लेक – शहराच्या मध्यभागी असलेले सुंदर सरोवर, ओल्ड क्वार्टर – जुन्या बाजारपेठा, अरुंद रस्ते आणि स्ट्रीट फूड, हो ची मिन्ह समाधी – राष्ट्रनायकाला आदरांजली, टेंपल ऑफ लिटरेचर – कन्फ्यूशियसला समर्पित ऐतिहासिक विद्यापीठ. येथील पारंपरिक वॉटर पपेट शो देखील पर्यटकांसाठी अनोखा अनुभव ठरतो.

हालोंग बे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले हे ठिकाण  समुद्रातून उभ्या असलेल्या चुनखडीच्या बेटांसाठी प्रसिद्ध आहे. बोटीवर राहण्याचा (क्रूझ) अनुभव अद्वितीय असतो, कयाकिंग आणि गुंफा पाहणी येथे अविस्मरणीय अनुभव देतात.

Halong Bay

————————————————————————————————-

Sapa Rice Terraces

सापा हे  डोंगरातील एक सुंदर गाव जिथे हिरव्या तांदळाच्या शेतीच्या पायर्‍या (टेरेस फार्मिंग) , स्थानिक आदिवासी जमाती, ट्रेकिंग मार्ग. उन्हाळ्यात हिरवाई, तर हिवाळ्यात थंडी व धुक्याचा अनुभव  मेकाँग डेल्टा इथे नौकाविहार, तरंगते बाजार (Floating Markets), ग्रामीण जीवनाचा अनुभव.

हो ची मिन्ह सिटी ( जुने नाव सैगॉन) हे आधुनिकतेचे केंद्र जिथे गगनचुंबी इमारती, वसाहतकालीन कॅथेड्रल्स, युद्धसंग्रहालय, नाईटलाइफ.आहे, शिवाय नोट्रे डेम कॅथेड्रल, वॉर रेमनंट्स म्युझियम, आणि कू ची टनेल्स – युद्धकाळातील भूमिगत बोगदे आणि गजबजलेले बेन थान मार्केट

Ho Chi Minh City

—————————————————————————————————-

Masoleum

————————————————————————————————–

Reunification museum Cu Chi Tunnels

होई आन . काळ थांबलेले गाव, फ्रेंच, चिनी व जपानी प्रभाव असलेली वस्ती. हे रंगीबेरंगी जुने शहर प्राचीन व्यापारी शहर असून येथील लँटर्न फेस्टिव्हल जगप्रसिद्ध आहे. पिवळसर रंगाच्या इमारती, पारंपरिक कपड्यांची दुकाने आणि नदीकाठचा देखावा पर्यटकांना भुरळ घालतो.

Hoi An Lantern Festival

—————————————————————————————————-

दा नांग शहर  समुद्रकिनारे आणि आधुनिक वास्तू, माय खे बीच, गोल्डन ब्रिज – विशाल हातांनी धरलेला पूल,मार्बल माउंटन्स करीत  प्रसिद्ध आहे.

Da Nang Beach, Golden Bridge

निन्ह बिन्ह हे  भूमीवरील हा लॉंग बे असल्यासारखे आहे. इथे पण गुहा, नद्या, आहेत आणि नौकाविहार पण करता येते. . येथे त्रांग आन लँडस्केप प्रसिद्ध आहे.

व्हिएतनामी खाद्यसंस्कृती

Vietnamese Local cuisine

व्हिएतनाममधील पदार्थ साधे, ताजेतवाने आणि आरोग्यदायी असतात. फो (Pho) – नूडल सूप, बान्ह मी (Banh Mi) फ्रेंच शैलीतील सँडविच, गोई कुऑन (Spring Rolls) – भाज्या आणि मांस गुंडाळलेले रोल, सीफूड – ताजे मासे, कोळंबी, खेकडे हे इथले प्रसिद्ध खाद्य पदार्थ व्हिएतनामी कॉफी हि  गोड कंडेन्स्ड मिल्कसह दिली जाते आणि प्रत्येक पर्यटकाने पिऊन लॅझ्यात घ्यावी अशीच आहे. शिवाय एग कॉफी पण विशेष लोकप्रिय.

खरेदी आणि चल

खरेदी करण्याकरिता प्रत्येक शहर मध्ये मार्केट्स आहेत. प्रामुख्याने घ्यावे असे सिल्क वस्त्र, लँटर्न्स (कंदील), हस्तकला वस्तू , रेशीम, लाकडी वस्तू, कॉफी आणि मसाले. हनोईचे डोंग झुआन मार्केट, हो ची मिन्ह सिटीचे बेन थान मार्केट, होई आन मधील पारंपरिक कपडे व दिवे खूप प्रसिद्ध आहेत.

भारतीय पर्यटकांसाठी खूप सोपी  ई-व्हिसा प्रणाली उपलब्ध आहे. व्हिएतनाम चे चलन व्हिएतनामी डोंग (VND) असे आहे.  एका भारतीय रुपयाला साधारण २९५ डाँग मिळतात तर एक अमेरिकी डॉलर ला २६,००० डाँग येतात.

हवामान
देश उत्तर ते दक्षिण लांब लचक पसरल्यामुळे इथले वेगवेगळ्या भागात हवं पण वेगळे आहे. उत्तर व्हिएतनाम मध्ये उष्ण कटिबंधीय हवामान. हिवाळ्यात थंडी, उन्हाळ्यात उष्णता. मध्य भागात  चक्रीवादळांचा प्रभाव जास्त, तर दक्षिण व्हिएतनाम मध्ये वर्षभर उष्ण व दमट असते. पावसाळा मे ते ऑक्टोबर, तर कोरडा हंगाम नोव्हेंबर ते एप्रिल. त्यामुळेच व्हिएतनाम चा प्रवासाचा सर्वोत्तम काळ हा  नोव्हेंबर ते एप्रिल.

व्हिएतनाम हा फक्त इतिहासाचा किंवा युद्धाचा देश नाही, तर तो निसर्ग, संस्कृती, आधुनिकता, साहस आणि आत्मीयता यांचा संगम आहे. हनोईतील प्राचीन मंदिरे, हा लॉंग बेतील नैसर्गिक चमत्कार, होई आनची शांत गल्ली, हो ची मिन्ह सिटीचे आधुनिक जीवन, मेकाँग डेल्टाचे ग्रामीण सौंदर्य – हे सर्व अनुभवण्यासाठी व्हिएतनामला नक्की भेट द्यावी.

पर्यटकांसाठी व्हिएतनाम हा आशियातील एक उदयोन्मुख पण परवडणारा पर्यटन रत्न ठरतो.

– नितीन दीक्षित

Avatar
About नितीन दीक्षित 2 Articles
मी भूगर्भशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. मला प्रवासाची आवड असल्यामुळे, मी करिअर म्हणून पर्यटन क्षेत्राची निवड केली. मला पर्यटन क्षेत्रात २६ वर्षांचा अनुभव आहे आणि मी भारतभर व जगभरातील अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. या वर्षांमध्ये मिळालेल्या अनुभवाचा वापर करून, मी पर्यटन स्थळांबद्दल, प्रवासातील नवीन संकल्पनांबद्दल, नवीन पर्यटन स्थळे, अपरिचित ठिकाणे, भारत आणि जगातील विविध ठिकाणांचे खाद्यपदार्थ, प्रवासादरम्यान खरेदीच्या कल्पना, लोकप्रिय पर्यटन स्थळांविषयी नवीन माहिती, साहसी पर्यटन, विषय-आधारित पर्यटन इत्यादी विषयी लिहिणार आहे. प्रवासातील काही तांत्रिक संज्ञा सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..