नवीन लेखन...

तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?

आज समोर रांग बघितली आणि भयानक प्रकार वाटला. सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते… अनेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते. साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या, कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते कारण तो मुरलेला साहेब होता ना. हा प्रसंग प्रत्येक शहरात दिसतो. त्यात आंब्याचे टाळं पण होते स्टेजवर.
त्याला काहीजण ‘ चमको ‘ म्हणतात.

एखाद्या राजकारण्याला ते आंब्याचे टाळं येताना दिसले की हबकतो. कारण पाच पंचवीस हजाराची फोडणी निश्चित.कुणासाठी तरी मदत मागतो. स्वतः क्रेडिट घेतो. कारण ह्यांचा वावर सगळीकडेच असतो . प्रत्येक कार्यक्रम ते असतातच. मग कधी तो कलाकार असतो , कमधी तो शिक्षणतज्ञ म्ह्णून असतो , कधी तो डॉक्टर जातो तर कधी तो कवी -लेखकही असतो. मला एक कळत नाही ह्या कवी-लेखकांनी लिहावे मस्त पैकी रहायचे कशाला पुढे पुढे करतात. कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पुरवणीमध्ये फोटो हा पायजेल कारण तयाची चटकच असते त्याला. पेप्रात फोटो आला की हा खुश…पण तो एक दिवसांचाच गणपती असतो आणि तो सुद्धा गल्लीतला .
दुसऱ्या गावात शहरात त्याचा मागमूसही नसतो. कार्यक्रमात तो अगदी प्रमुख पाहुण्याच्या जवळ उभा रहातो. कधीही दोन्ही कोपऱ्यात उभा रहात नाही कारण हे पेपरवाले निश्चित त्याचा फोटो कापणार, पेपरवाले हरामी असतात म्हणजे फोटो कापण्यात.

एक दोनदा कोपऱ्यात उभा राहिला टाकला फोटो मधून कापून. म्ह्णून तो विशेष काळजी घेतो, अगदी सराईत सावधपणे.
मध्ये उभे राहिले की झक मारून तो फोटो लावता येतो. कारण त्या फोटोमधून त्याला एडिट करता येत नाही. असा तो हळूहळू मोठा होत जातो. पेप्रात फोट म्हटल्यावर साधी माणसे मानतात त्याला कारण पेपेपरातफोटो आला म्हणून. ह्या बाबतीत हे आंब्याचे टाळं फार जागरूक असत. समजा आपल्या नावापुढे भाऊ किंवा राव नाही लावले गेले की चिडतो.

आज तो पण दिसला.भाषण देण्यात एकदम तरबेज, प्रमुख पावण्याच्या आधी बोलून घेतो, इतका बोलतो की प्रमुख पाहुण्यांचा बोलण्याचा स्टॅमिना खलास होतो. तिकडे मीडिया वाले बोबलत रहातात कारण त्यांना प्रमुख पावण्याची ‘ बाईट ‘ हवी असते.
परंतु हा आधीच ‘ चावत ‘ असतो.. उद्या पेप्रात हमखास फोटो आहे बघा तुम्ही. आणि खरेच त्याचा फोटो आला आणि समोरच्या चहावाल्याने पहिला. त्याने सांगितले त्याला चहा पण मिळाला . त्याने पैशाचे पाकीट काढले…म्हणा नाटक केले. तितक्यात चहावाला म्हणाला काय साहेब. आंब्याचे टाळं एकदम खुश. चहावाल्याने त्याला वाकून नमस्कार केला. आंब्याचे टाळं भलताच गहिवरल . नाक्यावरचे लोक हे रस्त्यात बघत होते.आणि असेच गावागावात आंब्याचे टाळं खुश होत असणार हे निश्चित.
पण त्याचा उपयोग कुणाला…त्या बिनशेडीच्या नारळाचा उपयोग कुणाला..
त्याच्या बायकोला चटणी करायला..
तो नेहमीच होत असते…
..आणि म्हणत असते जा उनाडायला .

-सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..