नवीन लेखन...

हिवाळा

हिवसी हिवसी थंडी बोचरी,
अंगास झोंबे गार गारूसी,
दुधाळ धुक्याची चादर वढुनी
धरती धवल रंगात रंगली….!

नवप्रभा अन नवचैतन्य,
गगणविहारी कलरव करती,
कवळे कवळे ऊन रवीचे,
भल्यापहाटे सत्संग करती….!

दारोदारी चेतती शेकोट्या,
तिथे चालती टिका चकाट्या,
कुणी उगाच खवचट बोलितो,
कुणी विनोदे खसखस पिकवी….!

जिकडे तिकडे चहल चहाटी,
सळसळ चेते चैत जगती,
पळ पळ पळे जव रवी आकाशी,
वळ वळ करते जगरहाटी……!

वेल वृक्षांवर मोती पखरले,
दव नसेच ते अमृत सांडले,
पर्णस्वादे रंध्रे ते प्राशन करती,
मला तर वाटे बाल घुटी ती….!

©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली.
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..