नवीन लेखन...

तुकोबा

तुका…..! युगे युगे गुलामगिरीत जगलेल्या, अन माणसालाच जनावर बनवुन, त्यांच्यावर अंमल करणार्‍या, वर्णवादी व्यवस्थेवर आसुड ओढुन, तु तुझ्या अभंग ओव्यांनी, येथील भुमिपुत्रांच्या मेंदुवरील, जळमट पाश काढुन, तु माणसाला माणसात आणलं…! गारूड केलं तुझ्या ओव्यांनी, ईथल्या जनसामान्यावर…! झाडा पाखरांत रमणारा तु, आडाणी देवभोळ्या समाजाचे शोषण बघुन व्यथीत झाला, आणि त्यांच्या देवालाच, आव्हाण देऊ लागलास, तेंव्हा मात्र हादरली […]

हिवाळा

हिवसी हिवसी थंडी बोचरी, अंगास झोंबे गार गारूसी, दुधाळ धुक्याची चादर वढुनी धरती धवल रंगात रंगली….! नवप्रभा अन नवचैतन्य, गगणविहारी कलरव करती, कवळे कवळे ऊन रवीचे, भल्यापहाटे सत्संग करती….! दारोदारी चेतती शेकोट्या, तिथे चालती टिका चकाट्या, कुणी उगाच खवचट बोलितो, कुणी विनोदे खसखस पिकवी….! जिकडे तिकडे चहल चहाटी, सळसळ चेते चैत जगती, पळ पळ पळे जव […]

माहेरचा पाऊसं

मह्या शेतातलं पिकं, कस डौलतया तोर्‍यातं, शेतं हिरव हिरवं, मन हारके सुखानं. नभ ढगाळ ढगाळ, झोंबी झोंबाडं गारवा, मना सुखवी शिळानं, पिक नाचे शहारून. ढगं बरसती थेंब थेंब, मोती पखरले शेतातं, त्याचा लेऊन शिंगार, पिकं डौलते डौलात. हिरवले रानं वनं, गेली सृष्टि गोंजारूनं, पशु पक्षी चहकती, कोकिळं करीते गुंजनं. पशु,पक्षी,झाडं,वेली, अवघी धरा उल्हासली, आला महेरचा पाऊस, […]

माणसांना उभे करणारे शब्द !

” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी – […]

कामवाली

नाही कशी म्हणू, पगार जास्त देते थांब, परी माझे काम सोडून जाऊ नको लांब.. ! नाही कशी म्हणू तुला, तुझा काढते वीमा, फंड पण विरोधात नको माझ्या पुकारुस बंड.. ! नाही कशी म्हणू तुला, T.V. पहा दूपारी, परी आधी माझे काम आणि, मग जा शेजारी.. ! नाही कशी म्हणू तुला, वर्षाकाठी साडी, परी सोसायटीमधल्या मला, सांग […]

सखा

माझ्या मनाच्या कोपर्‍यांत, तू घर करुन असतोस जरी मला वर्षातून एकदाच भेटतोस लहरी तर इतका की, लहानासारखा रुसतोस अन् ठरलेल्या वेळी यायचच टाळतोस, पण आलास की, हळवा होऊन मला बिलगतोस, म्हणून तर मला तू खूप आवडतोस येताना ओंजळभर सुगंध आणतोस, अधिर मनाला क्षणांत खुलवतोस. कधी कधी भारीच हं, धसमुसळा वागतोस अन् निलाजरेपणाने अंगचटीलाही येतोस, पण आलास […]

संसाराची सप्तपदी

अरे संसार संसार, मालिकांच्या काट्यावर आधी नारी सोफ्यावर, ब्रेकमधे मग कुकर अरे संसार संसार, गोजीरवाण्या ह्या घरांत एकापेक्षा एक इथे, अग्रिहोत्री जे वाडयात अरे संसार संसार, चार दिवस सासूचा, आहे मग कुलवधूच्या, भाग्यलक्ष्मीच्या कुंकवाचा अरे संसार संसार, ह्याला जीवन ऐसे नाव, पिंजरा त्याले म्हणू नये, तिथे वारसाचा ठाव अरे संसार संसार, लज्जतदारशा मेजवानीचा चारचौघी सुगरणींचा आणि […]

अतिरेकी सरकार

जखमा उरांत माझ्या, आहेत अजूनी ताज्या, शासनकर्त्या नाकर्त्या तू हो आता तरी जागा गेंडयाच्या तव कातडीची तू, कुठवर राखशी नीगा? त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू काढ शोधूनी धागा स्फोट मालिका सदाच घडती, मुंबापुरीच्या कुशीत, निद्रीस्त सुरक्षा तुझी, घुसती अतिरेकी वेशीत पूरे जाहले नाटक तुमचे, समिती-चौकशी–खटल्याचे, वरातीमागून धावत येते, घोडे तुमचे नित्याचे जनतेच्या मग पैशावरती, दान वाटिता लाखाचे […]

एक हळव प्रेम

आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ नाना-नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ अहो दात नाहीत तरी घेतले चणे-दाणे चघळायला […]

बिच्चारा नवरा

कांही म्हणा आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट मिडीयासारखा बायको घेते येताजाता बाईट लग्नाआधी बरी वाटायची, साधी आणि भोळी एका गजर्‍यात देखील हिची, खुलायची खळी माझ्या आईला पाहूनही हिच्या गाली पडायची खळी निवड नाही चुकली आपली, वाटायच त्यावेळी, पुढे चित्रच बदलेल सार हे नव्हत मला माहित आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट सप्तपदीपुरतीच माझ्या मागे मागे चालली, नंतर कळलच नाही […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..