नवीन लेखन...

हेवा

पेन्शनची शिदोरी.FDचाही ठेवा जेष्ठ नागरिकांच्या देवा, करती सारे हेवा…. बॅंकेमध्ये ह्यांच्यासाठी, वाढीव व्याज दर रेल्वे,ST तिकीटावर ती, सवलतही फार सरावले आता सारे, सरावले आता सारे खावया हा मावा, जेष्ठ नागरिकांचा हेवा…… पर्यटनच्या ऑफीसांमध्ये, ह्यांच्या दिसती रांगा ह्यांच्या दारी चैतन्याची, उत्साहाची गंगा देशोदेशी फिरुनी येता, देशोदेशी फिरुनी येता मनी येई गारवा, जेष्ठ नागरिकांचा हेवा……. निसटलेले क्षण जगण्याचा, […]

कॅालेज कट्टा

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे, एक अजब सोहळा फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे, उरलाच वेळ तर स्टडी डे कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ, युवामहोत्सव, नाटयमहोत्सव, घरच्या कार्यापेक्षा जास्त बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार, पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार SMS चा चाळा, फॅशनचा लळा, हेच ह्यांचं रुटीन अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स, […]

बालपण

“देवबाप्पा” देव्हार्‍यांत तू, नुसताच असतोस ना बसून ? मग माझी ‘हरवलेली’ गोष्ट तेवढी, दे ना रे शोधून | अरे शोधून शोधून, मी गेलोय थकून, भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून ? शाळा आणि ट्यूशनमध्ये, पार गेलोय पिचून, नंबरासाठी अभ्यासही करावा लागतो घोकून | आई बाबां साठी एखाद्या, छंदवर्गाला बसतो जाऊन, मग दोस्तांसाठी खेळायला, सांग वेळ […]

Evergreen दादर

लाडाचं कोडाचं आमचं evergreen ‘दादर’ आमच्यासाठी तर ते जणू Godfather | दादर म्हणजे मुंबईच्या ‘पाठीचा कणा’ , टिकून आहे तिथे अजून ‘मराठीबाणा’ | उच्च वर्गिय, उच्च शिक्षितांचा डौल इथला देखणा, मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीने जपल्यात पाऊलखुणा | ‘शिवाजीपार्क’ म्हणजे आमच्या दादरची ‘जान’ शिवाजीमंदिर, प्लाझा, आमच्या दादरची ‘शान’ | मध्य पश्र्चिम रेल्वेचा ‘केंद्रबिंदू’ दादर दादर T.T., रानडेरोड, चौपाटीचा आम्हां […]

गणपतीचे मनोगत

टिळक तुम्ही फिरुन एकवार या हो जन्म घेऊन हव तर ब्रम्हदेवाकडे शिफारस तुमची मी देतो पाठवून किती उदात्त हेतूने गणेशोत्सव तुम्ही केला होतात सुरु पण हल्ली त्याच स्वरुप पाहून मीच लागलोय गुदमरु मोठया आतुरतेने मी वाट पाहायचो भाद्रपदातल्या चतुर्थीची वाट आता पाहावी लागते अनंत चतुर्दशीची काय सांगू टिळक तुम्हांला? संयोजकांनी मलाही केलय कार्पोरेट उत्सवांत माझ्या दर्शनाचे […]

सण “सक्रांतीचा”

धरेवर अवघ्या सुरु जाहले ‘उत्तरायण आज मकर राशीत संक्रमणकरता झाला रवीराज घेऊनी आला पौष मास सण संक्रांतीचा खास वृध्दींगत करण्या स्नेहबंध मुखि तिळगुळाचा घास स्निग्धता गोडवा घट्ट रुजे हा परस्परांच्या नात्यांत वैर नी कटूता विरुन जाई कांटेरी हलव्यांत संस्कार मूल्ये नारी पुजती सुगडांच्या स्वरुपांत परंपरेची देवघेव जणू वाणवसा लुटण्यांत पतंगाचा खेळही चाले सान-थोर पुरुषात मैत्रीचा संदेश […]

हालत

देख मेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान मेरेही घरमें मै मेहेमान, सूरज न बदला, चॉद ना बदला, ना बदला रे आसमान देखो वो कैसी है अकडती, बात बात पर मुझसे झगडती, देरसे आऊॅ दफ्तरसे तो देती ना वो ध्यान, बिबिकी….. मांसे तू-तू-मै-मै करती उसका बदला मुझसे लेती, रातरातभर पीठ दिखाकर करती वो हैरान, बिबिकी…… योगा-पार्लर, […]

नातं

रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर, प्रत्येक नात्याचा वेगळा आदर आईच्या गर्भात नात्याची रुजवात, जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती, नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक नात नव जुळत असतं, जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं म्हणून तळहाताच्या फोडासारख, जपाव लागत नात, अन् कळीसारख अलवार, फुलवाव ते लागत नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं, गरीब- […]

मैत्री

रक्ताच्या नात्याहूनही आगळी, ह्या नात्याची किमया, ना कोमेजे सुगंधीत ह्या मैत्र फुलाची काया | दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया, मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया | मैत्रीत नाही वजाबाकी, अन् नाही भागाकार, नफा-तोटाही नसे त्यामधी, नच असे व्यवहार | जात-पात ना वय जाणिते, निरपेक्ष-निर्मळ मैत्री, शब्दाविणही मुक्त भावना, दिसून येते नेत्री | विश्वासाने विसावण्याचा, खांदा एक मैत्रीचा, निर्णयासाठी कधी […]

मेरा भारत महान

‘देशा तुझीया तिरंग्याचा सार्थ आम्हां ‘अभिमान’ गर्वाने आम्ही सारे म्हणतो, मेरा भारत महान | स्वातंत्र्याचे ‘सेनानी’ अन क्रांतिवीरांना सलाम संग्रामिच्या शूर लढवय्या महिलांनाही प्रणाम | प्राण देऊनी त्यांनीदिधले, ‘स्वातंत्र्याचे’ दान, त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी ठेविला तयांचा मान | पण पवित्र देशा, कणखर देशा, सोन्याच्या देशा, काय जाहली बघ तुझी ही, आज अशी ‘दूर्दशा’ | कैसे जडले तुजला देशा […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..