नवीन लेखन...

सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्याकाळी म्हणजे साधारण इ.स.पू. ९०० मध्ये लढताना एखादा भाल्याचे […]

समर्थ रामदास स्वामी …..४

शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या […]

मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी, मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती ।।१।। एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली, पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली ।।२।। मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची, जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची ।।३।। युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी, रक्त बंबाळ केले […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

“बोला, मराठी बोला..”

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका.. मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण  आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत […]

मराठी माय माझी…

मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा! मराठी माय माझी… मराठी माय माझी… ममतेचा करते वर्षाव मजवरी… मराठी माय माझी… ममतेने करते संस्कार मजवरी… मराठी माय माझी… ममतेने मला शिकवण देणारी… मराठी माय माझी… ममतेने मला वळण लावणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या आवडी जपणारी… मराठी माय माझी… ममतेने माझ्या कला जोपासणारी… मराठी माय माझी… […]

कविची श्रीमंती

खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार । शिकला सवरला नाही जाणला संसार ।।१।। पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी । घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।२।। वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता । कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।३।। सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची । श्रेष्ठ पदीचा मान […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे, खिडकी मधूनी वाहे, मंद मंद वारे ।।१।। तोच अचानक तेथे, चिमणी एक आली, मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली ।।२।। जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला, काय घडले भोवती, कानोसा तो घेतला ।।३।। माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती, बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती ।।४।। मध्येच उडूनी जाई, […]

चूक

विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता. त्याने विजयला प्रश्न केला,’ कोठे आहेस ? उत्तरादाखल विजय म्ह्णाला,’’ आहे इकडे ! […]

ई-साहित्य संमेलन – मनोगत

रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्‍या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्‍या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्‍या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे […]

1 2 3 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..