नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली. […]

कंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..

संस्थानं साम-दाम-दंड-भेदाने मोडीत काढून सरदार वल्लभभाई पटेलांनी एकसंघ भारत उभा केला होता. आता तशीच वेळ पुन्हा आली आहे, परंतु सरदार आता नाहीत. सरदारांचा जगातला सर्वात उंच पुतळा मात्र आपल्याला प्रेरणा देत उभा आहे. त्या पुतळ्याला स्मरुन आपण देशात उगम पावलेल्या राजकीय प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याचं त्यांच्यासाठीच चालवलेलं त्यांचं राज्य खालसा करून, खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य आणण्याचा निर्धार करुया. आपणच सरदार बनूया..!! […]

मुंबईतील ऐतिहासिक पाऊल खुणांचा मागोवा.. – लेखांक ३२

खडा पारशी.. भाग दुसरा व शेवटचा – ‘खडा पारशी’ करसेटजींचे चिरंजीव मानेकजी करसेटजी यांच्या ‘व्हिला भायखळा’ या घरात १ सप्टेंबर १८६३ रोजी सुरु झालेली ‘अलेक्झांड्रा हायस्कुल’ ही मुंबईतील मुलींना इंग्रजी शिक्षण देणारी पहिली शाळा. ह्या शाळेच्या १८६४ सलत झालेल्या पहिल्या बक्षिस वितरण सोहळ्याला त्याकाळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर (मुंबईला देखणं स्वरूप देण्यात या व्यक्तीचा मोठा सहभाग […]

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा) अलीकडे कोणाला किती मतं मिळाली यापेक्षा, ‘नोटा’ला किती मतं मिळाली याची चर्चा रंगताना दिसते. २०१७ सालात झालेल्या गुजरातच्या निवडणुकीपासून ‘नोटा ला मत देण्याचं प्रमाणही वाढताना दिसतं आणि नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत तर नोटाचं प्रमाण आणखीनच वाढलेलं दिसलं. इतकं की, भाजपाला राजस्थान आणि मध्यप्रदेश या महत्वाच्या राज्यातील सत्ता गमवावी लागली. […]

अस्वस्थ मन, अस्वस्थ वर्तमान..

आहे मनोहर तरी.. – (भाग पहिला) आघाडी सरकारं, भ्रष्टाचार, बजबजपुरी, माजोरी झालेले सरकारी अधिकारी आणि गल्ली ते दिल्ली स्तरावरचे राजकारणी यांना कंटाळलेल्या जनतेने, सन २०१४ सालात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये बहुमताने श्री. नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या झोळीत आपल्या मतांचं दान टाकलं आणि केंद्रात भाजपाचं एकट्याच्या बळावरचं सरकार आलं. भारतीय राजकीय इतिहासात ही निवडणूक, धर्म-जात-पंथ-भाषा […]

मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं ?

हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]

७० रुपयांचं पुस्तक आणि मी..

परवाच दादरच्या ‘आयडीयल बुक स्टाॅला’त जाऊन ‘अजब प्रकाशना’ने ७० रुपयांत कोणतंही पुस्तक’ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे, तिचा लाभ घेतला. ह्या ‘सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा’ अशा जवळपास पन्नासएक पोस्ट माझ्याकडे आल्या. वास्तविक मी अशा कोणत्याही पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतोच, त्या मुळे अशा पोस्ट आल्या काय अन् न आल्या काय, मी तिकडे गेलोच असतो. […]

‘जावा’ने घडवलेली आठवणींची सफर – पूर्वार्ध

कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या […]

दिल्ली डायरी; दिल्लीचं श्री.अरविंद केजरीवाल सरकार..

गेले चार दिवस दिल्लीत राजकीय क्षेत्राशी संबंधीत कामं घेऊन मित्रांसोबत आलोय. माझा हा दिल्ली मुक्काम राजकीय दृष्ट्या वेगळे अनुभव देणारा ठरला. मी शक्यतो राजकारणावर लिहित नाही आणि लिहिलंच तर ते नकारार्थीच जास्त असतं. कारण ‘वेल्फेअर स्टेट’ किंवा ‘कल्याणकारी राज्य’ ही राजकारणाची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या आपल्या देशात राजकारण/ राजकारणी आणि ते ज्यांच्या कल्याणासाठी करायचं असतं ते सामान्य […]

नसलं तरी दाखवता आलं पाहिजे

नसलं तरी दाखवता आलं पाहिजे लेव्हलचं सेटींग करता आलं पाहिजे..!! काल केस कापून आलो. आश्चर्य वाटलं ना? डोक्यावर फारसे केस नसताना ते कसे काय कापले बुवा, असंच वाटलं असेल ना तुम्हाला? गंम्मत म्हणजे मलाही याचंच आश्चर्य वाटलं. मी महिन्यातून पाच वेळा केस कापतो. एका वेळेस ८० रुपये लागतात. या हिशोबाने महिन्याचे झाले ४०० रुपये. भरघोस जावळ […]

1 2 3 36
Whatsapp वर संपर्क साधा..