नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

खडा पारशी.. भाग १

मुंबई अग्निशमन दलाच्या बायखळ्याच्या मुख्यालयाच्या फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तो ‘खडा’ आणि पारश्याचा आहे म्हणून ‘पारशी’. हाच तो आपला ‘खडा पारशी’..!! मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाही ‘खडा पारश्या’चा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..! […]

शबरीमला….. अस्वस्थ वर्तमान..

केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही. […]

देव ‘जिप्सी’द्वारी भेटला..

तो मेसेज होता मराठीतले प्रसिद्ध लेखक श्री. वसंत वसंत लिमये यांचा. ‘लाॅक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ ह्या दोन रहस्य-थ्रिलर कादंबऱ्यांतून चोखंदळ मराठी वाचकांच्या घरात आणि मनात पोहेचलेले श्री. वसंत वसंत लिमये यांची माझी भेट झाली. अगदी ठरवून झाली. […]

कंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..

संस्थानं साम-दाम-दंड-भेदाने मोडीत काढून सरदार वल्लभभाई पटेलांनी एकसंघ भारत उभा केला होता. आता तशीच वेळ पुन्हा आली आहे, परंतु सरदार आता नाहीत. सरदारांचा जगातला सर्वात उंच पुतळा मात्र आपल्याला प्रेरणा देत उभा आहे. त्या पुतळ्याला स्मरुन आपण देशात उगम पावलेल्या राजकीय प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याचं त्यांच्यासाठीच चालवलेलं त्यांचं राज्य खालसा करून, खऱ्या अर्थाने आपल्या देशावर प्रजेने प्रजेसाठी चालवलेलं प्रजेचं राज्य आणण्याचा निर्धार करुया. आपणच सरदार बनूया..!! […]

आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)

मोदी सरकारचा जनाधारावर येत्या निवडणुकीत ‘नोटा’ परिणाम करेल, असं मला वाटतं, त्याचं मला वाटणारं सर्वात पहिलं कारण म्हणजे, स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आणि त्यात लोकप्रतिनिधींचा असलेला अप्रत्यक्ष सहभाग. […]

आहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)

भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला खीळ बसली ती नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसहीतच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालांनी. ह्या हिंदी पट्ट्यात झालेल्या निवडणुकांत तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता गमावली. भाजपच्या या राज्यांतील पराभंवामागे त्या त्या राज्य सरकारांचा कारभार, अँटी इनकॅबन्सी इत्यादी काही कारणांप्रमाणे मतदारांनी ‘नोटां’चा केलेला प्रभावी वापर हे देखील एक कारण आहे. […]

शबरीमलाच्या निनित्ताने..

नेहेमी ‘मन कि बात’ करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी आज मात्र थोडीशी ‘काम कि बात’ केलीय. ‘भारतीय विज्ञान काॅंग्रेस’ च्या १०६व्या अधिनेशनात बोलताना पंतप्रधांनानी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’च्या जोडीला ‘जय अनुसंधान’ असा नारा देऊन, संशोधकांनी समाजोपयोगी संशोधनावर भर द्यावा असा सल्लाही दिला..’जय विज्ञान’ हा नारा आपले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वायपेयींनी या पूर्वी दिला होता. पंतप्रधानांनी […]

‘येणें वरें ‘नितीनो’ । सुखिया झाला ।।’

आपण बऱ्याचदा ठरवतो एक आणि होतं वेगळंच. आता बघा ना, अगदी काल-परवाच, म्हणजे ३१ डिसेंबरला मी ‘जरा विसावतो या वळणावर’ हा लेख लिहून नविन वर्षात मी फार लेखन करणार नाही असं मनोगत व्यक्त केलं होतं. माझ्या लिखाणात आणखी सकसता, सजगता आणि चौफेर दृष्टी येण्यासाठी, मला आणखी भरपूर वाचन करण्याची आवश्यकता असल्याचं मला गेले काही महिने जाणवतंय […]

जरा विसावतो आता ..

वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. तो आपल्या दैनंदिन कर्तव्याचा भाग असतो व असं कर्तव्य ‘मी केलं’ या सदरात येत नाही. सर्वच जीवमात्र ते करत असतात आणि त्याचं मला फार कवतुक वाटत नाही. मला […]

मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं ?

हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]

1 2 3 4 5 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..