नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

गूढ संख्यांचे..जन्मतारखांचे !

आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात.. […]

पुराणातील दशावतार आणि चार्ल्स डार्विनची उत्क्रांती: एक साधर्म्य

डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराण आणि आधुनिक विज्ञान यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ.. […]

महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केंव्हाच मागे पडलेत. स्त्रियांची जागी झालेली महत्वाकांक्षा, कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता या साठी महिलांना घडाळ्याकडे बघून […]

मावशी जगो, माय तर जगोच जगो..!!

आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण […]

आपल्या देशाचे नांव INDIA, इंडीया कसे झाले?

सध्या व्हाट्सॲपवर आपल्या देशाला India हे संबोधन कसे प्राप्त झाले त्याची निखालस खोटी व कोणताही ऐतिहासीक आधार नसलेली विकृत माहिती देण्यात येत आहे. ती माहिती अशी आहे – “INDIA – Independent Nation Decleared In August असा नामनिर्देश केल्या गेलेल्या हिन्दुस्तानला त्याचा shortform इंग्रजांनी केला INDIA..” खरी माहिती अशी आहे – आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत […]

खासीयत बुधवारची..

मित्रांनो आज बुधवार! या ‘वारा’चा माझा ज्योतिषशास्त्रीय अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना अंधश्रद्धा वगैरे वाटेल त्यांनी याकडे केवळ गंम्मत म्हणून पाहावे ही नम्र विनंती. आमच्या ज्योतिषशास्त्रात ‘बुधवार’ रिपीटेशन साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे काय? तर, आपल्या नेहेमीच्या ‘रुटीन गोष्टीं’पेक्षा एखादी ‘वेगळी’ गोष्ट जर आपणं बुधवारी केली तर तीच किंवा तशीच एखादी गोष्ट त्याच दिवशी वा पुढील […]

मोदी म्हणजे कोण?

नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्‍याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो. या माझ्या खोडीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो […]

1 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..