नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

प्रेम कुणावर करावं?

“प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावरही करावं.. ज्याला तारायचं, त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं, त्याच्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं प्रेम.. योगावर करावं, भोगावर करावं, आणि त्याहुनही अधिक, त्यागावर करावं..” प्रेम कुणावरही करावं.. सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..! असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी ‘दिन’ पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक ‘डे’ची काय […]

गोरेगांवची फिल्मसिटी- ‘वेड्यांची’ एक अद्भूत नगरी..

आम्ही गोरेगांवच्या आरे काॅलनीतल्या ‘फिल्म सिटी’ची सैर केली..सोबत श्री. पेडणेकर नांवाचे फिल्मसिटीचे कर्मचारी मार्गदर्शक म्हणून आले होते.. दुपारी १२ वाजता आमची ट्रिप सुरू झाली व सायंकाळी ४ वाजता संपली.. सिरियल, चित्रपटात दिसणारे भव्य बंगले, त्यातील राजेशाही दिवाणखाने, प्रचंड मोठे राजमहाल, गांवं, रस्ते हे प्रत्यक्ष पाहताना खुप मजा वाटली..आम्हाला ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मराठी सिरियलमधील ‘बानू’ची झोपडी […]

मेक इन इंडीया – एक ‘मस्ट सी’ इव्हेन्ट..

आज सकाळी मी माझ्या दोन मुलांना घेऊन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भरवलेल्या ‘मेक इन इंडीया : मेकींग इंडीया’ प्रदर्शनाला जाऊन आलो. सरकारच्या पुढाकाराने भरवलेलं हे बहुदा पहिलंच प्रदर्शन असावं.. खरंतर ‘प्रदर्शन’ हा मराठी शब्द याचं भऽऽव्य स्वरूप सांगण्यासाठी खुप तोकडा आहे.., परंतू मराठी भाषेतील दुसरा शब्द  नसल्याने मी ‘प्रदर्शन’ हाच शब्द मी वापरतोय.. आपला देश जगातली किंवा आशीया […]

अशोक राणे; सिनेमा पाहणारा माणूस..!!

आपल्यापैकी प्रत्येकजण उपजिविकेसाठी काही ना काही उद्योग-धंदा करतो.. आपल्यालाही कशाची न कशाची तरी आवड असते..मात्र आपला व्यवसाय व आपली आवड यांचा ताळमेळ कधीच बसत नाही..आवड आणि व्यवसाय यांची सांगड बसली ना, की मग ते काम ‘बोजा’ न बनता आनंदाचा स्त्रोत बनतं..समाधीची अनुभुती देणारं ठरतं..खुप कमी माणसं अशी भाग्यवान असतात..अशाच काही सुदैवी लोकांपैकी एक आहेत माझे ज्येष्ठ […]

मला एक प्रश्न पडलाय..

मला एक प्रश्न पडलाय…..उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील……तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो.. “महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रिय कुलावतंस.. सिंहासनाधीश्वर.. गो ब्राम्हण प्रति पालक.. राजाधीराज ‘छत्रपती’ शिवाजी महाराज” यांच्या उपाधीतील ‘छत्रपती’ हा शब्द, ‘छत्रपती’ की ‘क्षेत्रपती’..?” ‘क्षेत्र’ म्हणजे एखादा मोठा, विस्तृत प्रदेश आणि त्याचा अधिपती, राजा ‘क्षेत्रपती’ असणं योग्य की ‘छत्रपती’? […]

मंत्रालय आणि सामान्य माणूस

मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं.. तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही.. मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या […]

मृत्यू, मारुती, शनि आणि स्त्रिया..

आपल्या ज्योतिषशास्त्रात ‘शनि’ ही मृत्यु देवता आहे. ही देवता आपल्यावर प्रसन्न राहावी यासाठी पूजा करतो पण ती मारुतीची..! शनी आणि मारूती यांचा संबंध काय, याचा माझ्या परीने विचार करताना एक तर्क मांडता येतो.. ‘मारुती’ या शब्दाचं, मराठीतल्या ‘मृद’ या शब्दाशी जवळचं, सख्खं असं नात असलं पाहीजे असं मला वाटतं..’मृद’ म्हणजे माती आणि आपणं मरतो म्हणजे तरी […]

कर्दळीवन परिक्रमा : एक प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव

प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे.. […]

१३ ही संख्या अशुभ का मानतात..? ती खरोखरच अशुभ आहे का?

पुढारलेला असो वा मागास, जगातील प्रत्येक समाजात काही न काही अंधश्रद्धा असतातच! अंधश्रद्धा काही प्रमाणात ‘जगणं’ सुसह्य करतात असंही म्हणता येईल. युरोप-अमेरीकेतील वैज्ञानीक दृष्ट्या पुढारलेला देश असो वा भारतासारखा आध्यात्मीक भगव्या प्रकृतीचा देश असो, अंधश्रद्धा ह्या असायच्याच..! […]

पत्रिकेतील ‘मंगळ’दोष व नाहक अडलेली लग्न..!

मंगळ म्हणजे जातीवंत लढवय्या ! अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार..! न पटणारी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. एखादा गुंड मंगळाच्या प्रभावाखाली असू शकतो तसाच एखादा निष्णात सर्जनही..! मंगळाचे हे गुणधर्म आपल्या सर्वांच्याच कुंडलीत असतात पण ज्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते त्या व्यक्तीत या क्वालिटी उठावदारपणे असतात एवढंच ! […]

1 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..