नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

इसवी सन १९०० अखेरीस मुंबईत असलेली हिन्दू मंदिरं

मुंबई शहरातील देवतांचा अभ्यास करताना, सन १८९५ साली श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी यांनी इंग्रजीत लिहिलेलं ‘The Hindu Temple of Bombay’ हे पुस्तक मुंबईच्या एशियाटिक सासायटीत हाती लागलं. सन १९०० अखेरीस मुंबईत असलेल्या सर्व महत्वाच्या मंदिरांचा, त्यातील देव-देवतांचा आणि त्या देवळांवर असलेल्या सरकारी किंवा खाजगी मालकीचा अत्यंत सुंदर आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. श्री. […]

श्री. रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम; व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती..

श्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. […]

बायका आणि चंद्रावरच्या खड्ड्यांचं रहस्य..

बायका कुणाला, कधी, कुठे आणि काय विचारतील आणि कुठून कुठे पाठवतील याचा थांग ब्रम्हांड निर्मात्या ब्रम्हदेवालाही लागणार नाही, हे मात्र खरं. हे सर्व नाट्य दादर स्टेशनवरच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक चारवर अवघ्या ४५ सेकंदात घडलं. ४५ सेकंद अवधी मुंबई बाहेरची जनता जमेसही धरत नसेल, मुंबईत मात्र या वेळेत चंद्र ते व्हाया पृथ्वी पुन्हा चंद्रावरचा आणखी एक खड्डा एवढा प्रवास सहजपणे होतो.. […]

सन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..

काल इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोळी बांधवांचा ‘नारली पुनवे’चा सण साजरा होताना प्रत्यक्ष पाहिला. आता पर्यंत नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करातात, ते टिव्हीवर पाहिलं होतं. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून दुसऱ्या दिवसापासून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आपली होडी दर्यात ढकलतो, येवढंच शाळेच्या पुस्तकांतून नाॅलेज मिळालं होतं. या निमित्ताने ‘कोळी डान्स’ होतो, हे ज्ञान […]

प्रमोद साळुंखे – आपुलकीने वागणारा फिरस्ता..

प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित. प्रमोद, त्याचा थोरला भाऊ अरुण आणि या दोघांचे वडील बाळाप्पा त्यांच्यापैकीच एक. […]

महाराष्ट्र शासनाचं शिक्षण क्षेत्रातलं सकारात्मक पाऊल..

दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या जोडीला आता राज्याच्या शिक्षण विभागाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचं शिक्षण मंडळ अर्थात एसएससी, एचएससी, केंद्रीय शिक्षण मंडळाचं सीबीएससी यांबरोबरच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या प्रमुख शिक्षण मंडळांच्या जोडीला आता ‘एमआयईबी’, म्हणजेच महाराष्ट आंतरराष्टीय शिक्षण मंडळाची भर पडणार आहे. […]

मी का लिहितो..

‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे. […]

मेरा भारत महान?

देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु. […]

दादर चा जन्म आणि बारसं..!!

मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबईच्या ब्रिटिशपूर्व इतिहासात फोर्ट विभागाव्यतिकिक्त वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नाझगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे, मात्र यात ‘दादर’ कुठेच नव्हतं. मग प्रश्न पडला तो, ‘दादर’ होतं की नाही की असल्यास अगदी नगण्य स्वरुपातील वस्ती होतं, हा..! […]

1 3 4 5 6 7 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..