नवीन लेखन...

बदलती भारतीय कटुंब पद्धती

नमस्कार मंडळी,

जाणून घेऊया आज आपल्या कुटुंबाचे महत्त्व. आपले कुटुंब म्हणजे नाती असलेल्या माणसांचा समूह. एकमेकांशी जोडलेले प्रेमाचे नाते. असा परिवार जो माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतो. कुटुंबाचे अनेक प्रकार आहेत. छोटे कुटुंब , मोठे कुटुंब, कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. तर एकत्र कुटुंबात दुय्यम नाते संबंधांचा अंतर्भाव असतो.

साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये वडील हा कुटुंब प्रमुख असतो. असे म्हणायला हरकत नाही की एकत्र कुटुंब हे वास्तवात एक स्वर्गच असत. जिथे आजी आजोबा , आई बाबा, भाऊ बहिण सगळे आनंदानी आणि गुण्या गोविंदाने राहतात. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपल्यात असलेले वाद सामंजस्याने मिटवले, तर आपले कुटुंब भक्कम राहू शकते. कुटुंबातील प्रेमभावना ही यात लाख मोलाचे काम करते. कुटुंब म्हणायला गेले ते चार भिंती मध्ये असलेले घरटे. मग ते घरटे छोटे असो या मोठे. कुटुंबातील सदस्य हे आपल्या जगण्याचे भक्कम आधार असतात. कोणत्याही कसोटीच्या क्षणी सतत सावलीसारख्या मागे उभे राहतात आणि आयुश्यात आपल्याला धीर देतात. आपल्या कुटुंबातील म्हणजेच परिवारातील आपले आई वडील आजी आजोबा हे आपल्याला आयुष्य कसं जगायचं हे शिकवतात.

पण दुर्दैवाने सांगायचे झाले तर आजकाल मात्र, सध्या फ्लॅट संस्कृतीबरोबर विभक्त कुटुंबांची संख्या वाढतेय. वाढत्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी धावपळ, एकमेकांशी कमी झालेला संवाद, माझे निर्णय मीच घेणार म्हणून असलेला हेका ! अशा अनेक कारणांमुळे आजकालचे एकत्र कुटुंब तुटत चालले आहे. घरात समजून सांगणारे आणि मार्गदर्शन करायला मोठे लोक नसल्या मुळे कुटुंबाचा आधार कुठे तरी हरवत चालला आहे. आपल्या परिवारातील मोठे सदस्य नसल्यामुळे कुटुंबातील असलेले नात्यांमधील कलह सुटण्याऐवजी वाढत जातो. गैरसमज चे प्रकार खूप वाढतात. परिणामी एकमेकांशी कधीकाळी असलेले प्रेमाचे नाते कायमचे तुटते. सध्या कुटुंबव्यवस्थेत हेच होताना दिसते आहे. सध्या कुटुंबव्यवस्थेतही हेच होताना दिसते आहे.

आम्हाला आता एकत्र कुटुंब पद्धत नको आहे. आम्हाला वेगळे राहायचे आहे. इतर कोणाची आमच्यात लुडबूड नको. इतरांची जबाबदारी आमच्यावर नको. अशा अनेक कारणांनी आजकालचे कुटुंब विभक्त होत चाललेले आहेत. आजकालच्या काळात परिवारात स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असे चालले आहे. तेव्हा परिणामाची चिंता केली जात नाही. अशा प्रकारच्या घटनांमुळेही कुटुंबावर परिणाम होत असतो. कुटुंबव्यवस्थेत होणारा कलह मिटवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे मोठ्यांनी सगळ्यांना सांगितले पाहिजेत.

तसे बघायला गेले तर वाद प्रत्येकाच्या घरात होतात. लग्न झाल्या नंतर सासू सूने मध्ये सुध्दा वाद मोठ्या प्रमाणात होतात किंवा काही ठिकाणी होत पण नाही. बरेचदा असे पहिल्या गेले की, या दोघांच्या भांडणंमुळे घर संसार विस्कळीत होऊन जातात. असंतोषाचे वातावरण सर्वत्र घरात पसरते. नवीन मुलगी घरात जेव्हा नवरी म्हणून येते तेव्हा तिने त्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रेमाने जवळ करायला हवे. तिने स्वताच्या आई वडिलांनी दिलेली शिकवण आणि संस्कार कधीही विसरू नये. तिने जर आपली मर्यादा जपायला हवी.

नवीन सून ही घरातली लक्ष्मी असते आणि एकत्र कुटुंब पद्धत असो या विभक्त घर संसार आणि नये संबंध टिकवण हे फक्त आणि फक्त त्या मुलीच्याच हातात असते. लहानपणी आपल्याला सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये एक वृद्ध आणि त्याच्या मुलांची गोष्ट आठवते. लाकडाची एक मोळी आणायला सांगून त्यातील प्रत्येक काठी मुलांच्या हातात देऊन ती तोडायला सांगतो. त्याची मुले ती लगेच मोडतात. त्यानंतर त्याची मोळी बांधायला सांगतात. प्रत्येकाला ती मोडायला सांगतो. मात्र, ती मोडली जात नाही. आपण एकत्र असलो, तर आपल्याला कोणी तोडू शकत नाही. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत म्हणजेच परंपरेत एकत्र कुटुंब पद्धत आहे. ते कायम तशीच असायला हवी. तीच प्रत्येक कुटुंबातील विश्वासामुळे आपल्याला यापुढेही टिकवून ठेवता येणे शक्य आहे.

कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.

निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१

Avatar
About निनाद चंद्रकांत देशपांडे 7 Articles
माझ्या बद्दल माझे लेख च आपल्याला सांगतील....
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..