खूप दिवस झाले मयुरी एकच वाक्य ऐकत होती. तुला काही येते की नाही. पण तिने प्रत्युत्तर देणे टाळले कारण तिने आईला वचन दिलं होते की ती उलट बोलणार नाही. तिला जमेल तेवढे आवरले आणि निघाली ती आपल्या कामाला, तिच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. कित्येक दिवस हे असेच चालले. एक दिवस तिने आपल्या परदेशी असलेल्या नवऱ्याला हे सर्व सांगितले.
तो म्हणाला तू थोडे सांभाळून घे, मी तुला ही आणि आईलाही सोडू शकत नाही. मी आल्यावर यावर मार्ग काढू. असे म्हणून त्याने वेळ निभावून नेली खरी पण पुढे काय. . . .
तरीही तिची अवस्था इकडे आड तिकडे विहिर. या कामाच्या समस्येवर अनेक उपाय करण्यात आले पण सगळे निष्फळ ठरले. मयुरी च्या सासूला वाटे मी जशी भट्टीत तापून लोखंडाचे सोने झाले तशी माझी सून व्हावी पण काय करायचं ती नवीन जनरेशन मधील
मयुरीला एक चांगली सवय होती. ती रविवारी आई किंवा आजीला फोन करायची आजी आणि आई दोघी मिळून यावर उपाय सांगितला. आणि मयुरी खुश झाली. कारण आईनं आणि आजीने तिला भेटायला बोलवून ज्या कामांना वेळ लागतो त्यांना कमी वेळेत कसे करावे हे शिकवले. आणि बघता बघता मयुरी ह्या सर्व कामात पारंगत झाली.
कधी कधी काम छोटं असते पण आपण त्याला मोठं मानून त्यापासून पळ काढतो तेच त्यावर विचार केला थोडा वेळ दिला त्यावर उपाय सापडतोच. मयुरी आणि आकाश यांच्या संसारात घरकाम आणि इतर कामामुळे विघ्ने येत होती. पण त्यापासून त्यांनी पळ न काढता तोडगा काढला आणि या मागे खऱ्या सूत्रधार ठरल्या आकाश च्या आई त्या निवृत्त शिक्षिका,ज्या सकाळी उठून आवरून लोकल ट्रेन पकडून आपल्या कामाविषयी सदैव तत्पर व प्रामाणिक राहिल्या. ज्यांनी आपल्या मुलांना घडवले त्या आपल्या मुलगी समान सुनेला ही घडवावे


Leave a Reply