नवीन लेखन...

दिल की गिरह खोल दो, चूप ना बैठो !!

“खामोशी” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे. […]

नियतीचे “समांतर” वेढे !

चित्रपटक्षेत्र एकच, स्पर्धा एकच तरीही धावणाऱ्यांना पुढे मागे ठेवणारे हे नियतीचे समांतर वेढे ! या जोड्यांमध्ये काही वेगळी जुळवाजुळव होऊ शकली असती कां ? […]

‘शेवटच्या रंगा’चे प्राणवायू !

प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते. […]

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! […]

‘देवबाभळी’- व्यक्त /अव्यक्ताचा झगडा !

फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री – पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला, पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता. पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते. […]

‘मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. […]

रोड टू संगम – ही पण बाजू !

साधारण हीच सकाळची वेळ ! ब्रेकफास्ट आटोपून दुसऱ्या चहाची वाट पाहात असताना सहज टीव्ही च्या रिमोटची खुंटी पिरगाळली. स्टार गोल्डवर ” रोड टू संगम ” पाटी दिसली. नांव न ऐकलेले पण ओम पुरी व परेश रावल (सोबतीला काही मराठी नांवे – राजन भिसे, स्वाती चिटणीस वगैरे) ! […]

शिकारा – बोलका पांढरा पडदा !

आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा “दाखवायचा”, काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे – कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या “पुष्पक ” प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं. […]

विक्रम – वेधा

आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी. […]

ह. म. बने, तु. म. बने

एकच सांगतो – त्या दिवसापासून मी ही मालिका पाहू लागलो. हरवत चाललेल्या (म्हणूनच हव्याहव्याशा ) कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांचे घट्ट भावबंध मी आवडीने बघतोय. शेवट थोडासा प्रचारकी /उपदेशपर होतो कधी कधी पण वीण मस्त. खूप दिवसांनी चांगली दैनिक करमणूक ! […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..