स्वप्नबंध (कथा)
स्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे. […]