नवीन लेखन...

खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

प्रदीप पटवर्धन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

प्रदीप पटवर्धन यांची करिअर ची सुरुवात :

मराठीत लोकप्रिय ठरलेल्या मोजक्या विनोदी अभिनेत्यांमध्ये प्रदीप पटवर्धन यांचे नाव आवर्जून घेतले जाते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. १९८५ साली आलेल्या सुयोग निर्मित ‘मोरूची मावशी’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामले यांच्याबरोबर त्यांनी भूमिका केली होती. या नाटकातील भूमिकेने त्यांना खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली

प्रदीप पटवर्धन यांची नाटके :

मोरूची मावशी’ या नाटकाचे त्यांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले होते. मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती.

दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, सखी प्रिय सखी, बायकोची खंत यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. प्रदीप, विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांचं ‘मोरूची मावशी’ हे नाटक भरत-केदार या जोडीने पुन्हा रंगभूमीवर आणलं.

प्रदीप पटवर्धन यांचे चित्रपट :

याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चश्मे बहाद्दर’, ‘1234’(2016), ‘लावू का लाथ’, ‘भुताळलेला’, ‘नवरा माझा भवरा’, ‘डोम’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘जमलं हो जमलं’, ‘एक शोध’ अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.
मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं.

एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर,  गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस,   बॉम्बे वेल्वेट,चिरनेर, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

प्रदीप पटवर्धन यांचे ईतर चित्रपट :

‘होल्डिंग बॅक’ (२०१५), ‘मेनका उर्वशी’ (२०१९), ‘थँक यू विठ्ठला’ (२००७), ‘1234’ (२०१६) आणि ‘पोलीस लाईन एक पूर्ण सत्य’ (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.

प्रदीप पटवर्धन यांच्या सोबत काम केलेली नटमंडळी :

नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्याबरोबर एकत्रित अनेक मराठी चित्रपटातून काम केले होते. अभिनेता – दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटातूनही प्रदीप पटवर्धन यांनी काम केले होते
भरत जाधव, केदार शिंदे यांसारख्या कलाकारांसाठी प्रदीप पटवर्धन ‘पट्या दादा’ होते.
विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन यांना पाहून आम्ही नाट्यक्षेत्रात आलो असं केदार शिंदे अनेकदा म्हणाले.

खळखळू हसणारा अवलिया :

प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनासह पुरस्कार जिंकले. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण अविष्कार होता. त्यांचा अभिनय पाहणं, ही एक पर्वणी होती. त्यांचं जाणं म्हणजे रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण अश्या या खळखळू हसवणाऱ्या या अवलियाच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत.

प्रदीप पटवर्धन यांची गाजलेली मुलाखत :

2018 मध्ये ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे यांच्यासोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पटवर्धन यांचे खास मित्र आणि अभिनेते विजय पाटकर यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून पाटकरांनी मित्राच्या अनेक आठवणी जागवल्या होत्या.
पाटकर गमतीने म्हणाले, मोरूची मावशी नाटकाच्या वेळी सुधीर भटांकडून काही तिकिटं विकत घेऊन प्रदीप पटवर्धन ती तिकिटं ब्लॅक करत होते.  हा त्यांचा बिझनेस माईंड आहे असं पाटकर गमतीने म्हणाले.  त्याला विरोध करताना आपली बाजू मांडताना प्रदीप पटवर्धन म्हणाले की बँकेची नोकरी असताना मी का तिकिटे ब्लॅक करू.
हे ऐकून कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद अनासपुरेसह केदार शिंदे आणि भरत जाधव मनमुराद हसले. ते पुढे म्हणले “माझ्या एण्ट्रीनेच मोरूची मावशी हे नाटक सुरू होतं. तर मी नाटकात एण्ट्री घेऊ का खाली ब्लॅकमध्ये तिकिटं विकत बसू?”

प्रदीप पटवर्धन यांचे निवासस्थान :

प्रदीप पटवर्धन हे गिरगाव येथील निवासस्थानी. ( झावबावाडी, चर्नी रोड ) येथे राहत असत . याच राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

चित्रपटांमध्ये केलं काम 

प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती.

प्रदीप पटवर्धन यांनी सांगितलेल्या कॉलेजमधील आठवणी :

प्रदीप पटवर्धन यांचा जन्म मुंबईत झाला. एका मुलाखतीमध्ये प्रदीप यांनी त्यांच्या कॉलेजमधील आठवण सांगितलं होती. ते म्हणाले होते की,’कॉलेजमधील एकांकीका स्पर्धेत ते भाग घेत होते. जवळपास 20 पेक्षा जास्त बेस्ट ऍक्टरचं बक्षीस  त्यांना मिळालं होतं. सुरुवातीला आई-वडिलांना हे सगळं चांगलं वाटतं होतं. पण वय वाढल्यानंतर नोकरी नव्हती त्यामुळे त्यांना काळजी वाटतं होती.  नोकरी नाही मिळाली तर बोरिवलीमध्ये रिक्षा चालवायला जायचं असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर  त्यांनी पाच सहा नोकऱ्या केल्या. एका हॉटेलमध्ये ग्लास पुसायला होते. बँकेमध्ये टायपिस्ट म्हणून देखील त्यांनी काम केलं. बँकेत नोकरी मिळाल्यानंतर आईनं त्यांना सांगितलं की तू नोकरी पण सोडायची नाही आणि नाटक पण सोडायचं नाही.’

एक फुल चार हाफ (1991),डान्स पार्टी (1995),मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009),गोळा बेरीज (2012) ,बॉम्बे वेल्वेट (2015),पोलीस लाइन (2016) ,एक दोन तीन चार (2016) ,परीस 2013,थॅक यू विठ्ठला 2017,चिरनेर 2019

हे त्यांचे सुप्रसिद्ध सिनेमे आहेत. पटवर्धन यांनी अमोल भावे यांच्या जर्नी प्रेमाची (2017) मध्येही भूमिका केल्या आहेत. . याशिवाय त्यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सिनेमा नवरा माझा नवसाचा यात ही काम केलं आहे.

प्रदीप पटवर्धन यांची गाजलेली जाहिरात :

तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे प्रदीप आणि प्रशांत यांनी साधारण ३०-३२ वर्षांपूर्वी एक जाहिरात केली होती. मुक्ता चमक या दंतमंजनाची ही जाहिरात होती. या जाहिरातीमध्येही प्रदीप आणि प्रशांत यांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला होता. खरंतर या जाहिरातीमध्ये प्रदीप यांनी एकही डायलॉग बोलला नाही आहे, पण केवळ हावभावांवरुन त्यांची जाहिरात मजेशीर ठरली.

दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोठी  पोकळी निर्माण झाली आहे.

विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप पाडली होती.

— भैय्यानंद वसंत बागुल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..