नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

चित्रतपस्वी साबानंद मोनप्पा

१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला. […]

चहा घेणार का?

पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो. […]

माणुसकीचा सातबारा

आज ना उद्या महेंद्र पुन्हा कामावर रुजू होईल. मायलेक आनंदाने राहतील आणि त्या सर्व मदत करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या, सेवाभावी संस्थांच्या सातबाऱ्यावर माणुसकीच्या या सत्कर्माची नोंद नक्कीच होईल… […]

‘आपलं’ दुकान..

आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. […]

खरा तो एकची ‘धर्म’…

भारतात टीव्ही सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत कमर्शियल जाहिरातींमधील दोन जाहिराती अविस्मरणीय ठरल्या. एक होती निरमा वाॅशिंग पावडरची व दुसरी एमडीएच मसालेची! या मसाल्याच्या जाहिरातीत जो फेटेवाला हसणारा वृद्ध दिसायचा, तो पहिल्यांदा माॅडेलिंग करणारा असेल असं वाटायचं. मात्र पाच दशकं झाली तरी उतारवयातही जाहिरातीत तोच दिसल्यावर खात्री झाली की, हाच ‘एमडीएच’ मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे! […]

खडू नव्हे, दीपस्तंभ

दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती. […]

घरानंतरचं बाहेरचं जेवण..

फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात… […]

आवाज की दुनिया

माणूस जन्माला आल्यापासून तो आवाजाशी जोडला जातो. आवाज आहे, तर कुणाचं तरी अस्तित्व सोबत आहे हे समजून येतं. अगदी पहिला आवाज तो ऐकतो स्वतःच्याच रडण्याचा. मग त्याला ऐकू येते का? ते पहाण्यासाठी खुळखुळा सारखी खेळणी घरात आणली जातात. कुणी पाळण्याजवळ येऊन ते वाजवलं की, ते बाळ त्या दिशेला नजर वळवतं. […]

एव्हरग्रीन चंद्रशेखर

मी देव आनंदचा जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पहात मोठा झालो. त्याचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासून सप्तरंगी चित्रपटही पाहिले, साठवणीतल्या आठवणीत ते जपून ठेवले. […]

एक तीळ नऊ जणात…

आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. […]

1 2 3 4 5 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..