नवीन लेखन...

मेरी हार्बरट–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मेरीचा जन्म 1 ऑक्टोबर 1903 रोजी आयर्लंड येथे झाला. तिचे सांकेतिक नाव  क्लाऔडिन होते. तिने कला शाखेत पदवी घेतली होती. तिला फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, जर्मन आणि अरेबिक भाषा येत होत्या. युद्ध सुरू झाले तेव्हा ती वोरसाच्या ब्रिटिश एमबसित काम करत होती. नंतर ती लंडन मध्ये हवाई मंत्रालयात ट्रान्सलेटर म्हणून काम करू लागली. 19 सप्टेंबर 1941 रोजी तिने वुमन एअर फोर्स मध्ये इंटलीजन्स क्लार्क म्हणून कामकरू लागली. तिने मार्च 1942 मध्ये वुमन एअर फोर्स सोडले व स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला. 39 व्या वर्षी ती संघटनेची सगळ्यात वयस्क एजंट होती.

एसओईच्या मते ती उंच,  सडपातळ होती. तिथे तिला कुरियरचे शिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर ती पाणबुडीतून जिब्राल्टर व तिथून फेलूका येथे पोहोचली. 31 ऑक्टोबर 1942 ला ती फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचली.तिथून ट्रेनने बोर्डक येथे गेली तिथे तिची भेट एसओईच्या बिसाकशी झाली. त्याचा ग्रुप गुप्तहेर संघटना चालवत  असे. फ्रेंच संघटकांसाठी मेरिने  ट्रेन व सायकलचा खूप मोठा प्रवास संदेश,कागदपत्र,पैसे, वायरलेस सुटकेस,घेऊन  केला.त्यात धोका होता. जून 943 मध्ये जर्मनीने खूप धरपकड केली. मेरीला अटक टाळण्यासाठी  इंग्लंडला परतण्याचे आदेश मिळाले.पण ती तिथेच लपून राहिली. 18 फेब्रुवारी 1944 ला तिला अटक करण्यात आली. त्यांना ती बिसाक वाटली.

चौकशीच्या वेळी तिने बिसाकला ओळखत नसल्याचे सांगितले. तुरुंगात तिला 24 तासांची एकांताची कोठडी देण्यात आली. पण इतर त्रास देण्यात आला नाही. तुरुंग स्वछ होता. तिला ईस्टर च्या दिवशी सोडण्यात आले.इंग्लंड मधील ससेक्स प्रांतात तिने फार्म हाऊस घेतले. फ्रांस तर्फे तिला “क्रोक्स द गुरे” अवॉर्ड मिळाले पण इतर एसओई एजंट प्रमाणे तिला कोणतेही अवॉर्ड देण्यात आले नाही. ती 23 जानेवारी 1983 रोजी न्यूमोनियाने वारली.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..