नवीन लेखन...

लिली सरगयूई – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

लिली सरगयू हि दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर होती . तिने डबल एजंट म्हणून महत्वाची भूमिका बजावली.

आधी आपण डबल एजंट म्हणजे काय समजून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.

ती “ ट्रेजर” या नावाने प्रसिद्ध होती. तिचा जन्म रशियातील सेंट पिटसबर्ग गावी २४ जानेवारी १९१२ रोजी झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीच्या वेळी त्यांचे कुटुंबाने फ्रांसला पलायन केले. तिचे शिक्षण पॅरिस येथे झाले. ती पत्रकारीतेत पारंगत होती. तिचे  इंग्रजी फ्रेंच व जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.तिला १९३७ मध्ये जर्मनीद्वारे गुप्तहेर खात्यात भरती होण्याविषयी विचारले होते पण तिने नकार दिला. पण फ्रान्सच्या पडवानंतर तिने जर्मनीला गुप्तहेर खात्यात काम करण्यास होकार दिला.

मेजर एमील किलमनने तिला शिक्षण दिले. १९४३ ला ती आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन स्पेनला गेली. तिने लगेच इंग्लंडच्या मादरीद येथील  m15 या गुप्तहेर संघटनेशी संपर्क केला. आपण जर्मन गुप्तहेर असल्याचे सांगून इंग्लंडसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. ती मागणी मान्य होऊन तिला लगेच इंग्लंडला रवाना केले. लिलि ला “treasure” नाव देण्यात आले व बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर कामाची संधि दिली. तिने डबल एजंट संबंधी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितले.

१९४४च्या मेमध्ये तिला बातमी समजली की तिच्या आवडत्या कुत्र्याचे निधन  झाले. यावर तिला प्रचंड राग  आला. तिने m15ला कळवले की तिच्याकडे काही गुपिते आहेत. तिने त्यातील काही फोडली.त्यावर तातडीने बैठक बोलावण्यात आली. पण तीला m15 मध्ये काम करू देण्यात आले. ती जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत राहिली. नंतर तिला संघटनेतून काढून टाकण्यात आले. इंग्लंडचे काही संदेश जर्मनीच्या एगनीमा यंत्राने पकडले १९४४ च्या शेवटी ती फ्रांसला परतली व फ्रेंच वूमन आर्मी सर्विस मध्ये काम करू लागली. ती रशियन भाषेची दुभाषी म्हणून काम करू लागली. १९४६ मध्ये तिने मेजर जॉन बारटन कॉलीन याच्याशी पॅरिसमध्ये लग्न केले. ते सोलोन येथे स्थायिक झाले.

१७ मे १९५० रोजी तिचे किडणीच्या आजाराने निधन झाले.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..