नवीन लेखन...

सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

सिसिलीचा 30 एप्रिल 1899 ला लंडनमध्ये झाला.

तिच्या आईचे नवऱ्याशी भांडण होऊन ती  सिसिलिला घेऊन फ्रांसला गेली. तिची आई नर्सचे काम करू लागली.तिथे तिचे डॉक्टर एलिक्स लेफोर्ट नावाच्या जखमी सैनिकाशी प्रेम जडले. त्या दोघांनी लग्न केले. आणि परिसमध्ये राहू लागले.

सिसिली जसजशी मोठी होऊ लागली तसतसा तिचा व्रात्यपणा वाढू  लागला.1939 मध्ये एलिक्सला सैन्यात भारती होण्याचे आदेश मिळाले. जर्मनीने फ्रांस काबिज केल्यावर सिसिलिने  लंडनला पलायन केले. तिने एसओई गुप्तहेर संघटनेच्या ऑफिसरशी बोलून ब्रिटनी शहरात एक व्हीला मिळवला. जेथे एसओईच्या गुप्तहेरांना लपण्यासाठी सुरक्षित जागा होईल.जिथून सुमारे 70 ब्रिटन व फ्रांस च्या गुप्तहेरानी जर्मन काबिज फ्रांस मध्ये प्रवेश केला.

जून 1941 ला तिने वुमन एअर फोर्सएमध्ये दाखला घेतला. 16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले.  पण आदेशांकडे दुर्लक्ष करून 15 सप्टेंबर 1943 च्या मध्यरात्री सिसिली व रेनोड रेमंड या   गुप्तहेराच्या घरी गेले.. यांची खबर जर्मन सैनिकांना लागली. त्यानी गुप्तहेराच्या घरावर धाड टाकली ज्या  गुप्तहेराकडे सिसिली व रेनोड गेले होते,त्यापैकी रेमंड  व रेनोड निसटण्यात यशस्वी झाले ओण सिसिली पकडली गेली. तिच्या अटकेमुळे सगळी संघटना पांगली.

सिसिलिला पहिल्यांदा लियॉन व नंतर पॅरिसच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तिथे तिची क्रूरपणे चौकशी करण्यात आली. 1 फेब्रुवारी 1944 रोजी तिला रेवनब्रूक यातनातळावर पाठवण्यात आले.तिथे तिला पोटाच्या अल्सरचे निदान झाले. यातनातळांवरील डॉक्टरनी तिचे यशस्वी ऑपरेशन केले. हॉस्पिटल मधून यातनातळावर आणल्यावर तिला फक्त घट्ट लापशी व पातळ सूप दिले जाऊ लागले. तिथे तिच्याकडून कष्टदायक कामे करवून घेण्यात आली. त्याच्या परिणाम तिचे कमालीचे  कुपोषण व डायरिया याच्यात झाले.

पुढे तिला युकेमार्क यातनातळावर पाठवण्यात आले. तिथे असि अफवा परसारवण्यात आली, वैद्यकीय सेवा उत्तम आहे. की तिथे कष्टाचे काम नाही,रोजची हजेरी नाही पण तसे नव्हते. तिला मुख्य कॅम्प जाण्यास सांगण्यात आले पण तिने नकार दिला.त्यावेळी तिची शारीरिक अवस्था खूप वाईट होती.

फेब्रुवारी 1945 मध्ये एके दिवशी तिचे नाव पुकारण्यात आले आणि तिला गॅस चेंबर मध्ये पाठवण्यात आले.(गॅस चेंबर म्हणजे एका चेंबर मध्ये जर्मन विरोधी नागरिकांना, ज्यात बहुसंख्य ज्यू असत पाठवत असत व विषारी वायु सोडून ठार मारण्यात येई, उद्देश हा की प्रत्येकाला मारण्यासाठी एक एक गोळी वापरायला लागू नये.) पुढे त्या यातनातळाचा प्रमुख श्वरझहुबर याला ब्रिटिशनी पकडले व 3 मे 1947 रोजी ह्एमलॅन तुरुंगात फाशी देण्यात आले.

सप्टेंबर 1945 मध्ये तिला फ्रांस व ब्रिटन द्वारा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..