नवीन लेखन...

समृद्धी आणि विनाश या सिंचनाच्या दोन बाजू कशा?

पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट.

पावसाळ्यातले काही दिवसच पाऊस पडतो. वर्षातले जवळजवळ ३२५ दिवस कोरडेच असतात. नद्यांवर धरणे बांधून जलाशय निर्माण करून, तसेच भूगर्भात साठलेले पाणी तुटीच्या काळात वापरले जाते.

पाणी दुधारी शस्त्र आहे. ते जीवनावश्यक आहे, तेवढेच विध्वंस घडविणारेसुद्धा आहे. त्याचा वापर आपण कसा करतो त्यावर भले-बुरे परिणाम अवलंबून असतात.

जिथे शेतीला हमखास पाणी मिळण्याची सोय झाली तिथे उत्पादन वाढते आणि शेती व्यवसायाला शाश्वत रूप मिळते. लहरी पावसावर अवलंबून असलेली शेती ना घर की ना घाट की, अशी बिनभरवशाची होते. सिंचित शेतीत बहुपीक पद्धत वापरून उत्पादन वाढविता येते. जमिनीचा कार्यक्षम वापर करून उत्पादकतेचा उच्चांक गाठता येतो. बहुवर्षीय पिके घेऊन महागडी दुर्मीळ उत्पादने घेणे शक्य झाल्याने समृद्धी येते.

सिंचनावर आबादी आबाद झालेली संस्कृती एक ना एक दिवस सिंचनामुळेच लयाला गेलेली दिसते. ही सिंचनाच्या नाण्याची दुसरी बाजू आहे.

समाजाची आर्थिक क्षमता वाढली की, चंगळवाद वाढतो. गरजा वाढतात, तशी उत्पादनवाढीसाठी अहमहमिका सुरू होते. निविष्ठांचा बेसुमार मारा होतो. विज्ञाननिष्ठा नसलेल्या समाजात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन तिला ओरबाडणे चालू राहते. मग शेतीचा समतोल बिघडून तिची अवनती सुरू होते. जमिनीची अतिलूट झाल्यामुळे तिचा शक्तिक्षय होतो. निचरा घटल्यामुळे क्षार वाढतात. दलदली निर्माण होतात. नद्या-नाल्यांत विशिष्ट वनस्पती वाढून त्यांची वहनक्षमता घटते. पात्रात गाळ साचून पाणी तुंबल्यामुळे संपूर्ण परिसर गुदमरतो आणि थंड पडतो. थंड जमीन अचेतन असते. वनस्पती, प्राणी, मनुष्य धरून सर्व सचेतन गोष्टी गरम असतात.

प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..