नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

कोको आणि चॉकलेट

थिओब्रोमा ककॅओ नावाच्या झाडाच्या फळांमधील बिया म्हणजे कोकोच्या बिया. या झाडाच्या खोडामधून फळे येतात. चॉकोलेट हे चॉकोलेट लिकर, साखर आणि लेसिथिन व कोको बटर एकत्र करून बनवलं जातं. […]

अणुभट्ट्यांच्या अपघातांचे स्वरुप

अणुभट्टीत अपघाताच्या वेळी होणारे स्फोट हे धोकादायक असले तरी ते अणुबॉम्बसारख्या तीव्रतेचे स्फोट नसतात. तसंच हे स्फोट अनेकदा अणुविखंडनामुळे नव्हे तर इतर कारणांमुळे घडून येतात. […]

अणुतंत्रज्ञानाचे वीजनिर्मितीव्यतिरिक्त इतर उपयोग

अणुभट्टीत निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थांचे बहुविध उपयोग आहेत. यात काही वेळा किरणोत्सारी पदार्थांचा प्रत्यक्ष वापर होतो, तर काही वेळा किरणोत्सर्गी पदार्थांपासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांचाच फक्त वापर केला जातो. […]

किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते?

अणुऊर्जानिर्मितीत वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा किरणोत्सर्गी कचरा निर्माण होत असतो. हा कचरा द्रवरूप, घनरूप वा वायुरूप असू शकतो. त्याचं रासायनिक स्वरूप वेगवेगळं असू शकतं. तसंच त्याच्या किरणोत्सर्गाचं प्रमाणही वेगवेगळं असू शकतं. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे त्या कचऱ्याच्या या सगळ्या गुणधर्मावरून नक्की केलं जातं. […]

सर्वसाधारण अणुभट्टी कशी चालते?

आजच्या अणुभट्ट्या या अणुकेंद्रकीय विखंडनावर आधारित आहेत. या अणुभट्ट्यांच्या गाभ्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे इंधन, मंदायक, शीतक आणि नियंत्रक कांड्या. […]

अणुभट्टीत वापरली जाणारी इंधनं

अणुभट्टीत वापरता येणारी युरेनिअम व्यतिरीक्त दोन इंधन म्हणजे प्लुटोनिअम आणि थोरिअम ही मूलद्रव्यं. यातील प्लुटोनिअम हे मूलद्रव्य निसर्गात उपलब्ध नसून ते अणुभट्टीतच तयार होतं. […]

समृद्ध युरेनियम म्हणजे काय?

ज्या युरेनिअममध्ये विखंडनक्षम अणूंची संख्या नैसर्गिक प्रमाणापेक्षा वाढवण्यात आली आहे, त्या युरेनिअमला समृद्ध युरेनिअम म्हटलं जातं. नैसर्गिक युरेनिअममध्ये विखंडनक्षम अणूंचं प्रमाण ०.७ टक्के असतं, तर समुद्ध युरेनिअममध्ये हेच प्रमाण साधारणपणे तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढवलेलं असतं. […]

अणुभट्टीत जड पाणी कशासाठी वापरतात?

जड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो. […]

1 2 3 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..