कोणत्याही यंत्राला आपलं काम पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. विजेवर चालणार्या यंत्राना वीज ती ऊर्जा पुरवते. पेट्रोलवर चालणार्या यंत्रांना पेट्रोलच्या ज्वलनापासून ती मिळते. आपलं शरीर हे एक अतिशय गुंतागुंतीचं तरीही अत्यंत कार्यक्षम असं यंत्रच आहे असं म्हटलं जातं. […]
नावडतीचं मीठ अळणी असं म्हणतात. तसंच मग आणखी कुणाचीशी साखरही निगोड का असू नये? वरवर हा थट्टेचा प्रकार वाटेल. पण खरं पाहता साखरेची गोडी सगळीकडे सारखीच असते असं नाही. अशी ती का बदलते हे समजून घ्यायचं असेल तर आधी साखर म्हणजे काय हेही समजावून घ्यायला हवं. […]
वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो. […]
एक दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या पूर्वीची दोन वर्षं कोरडी गेली होती. अवर्षणाचा तडाखा त्या भागाला बसला होता. खरं तर हा प्रदेशच मुळी पर्जन्यछायेतला आहे. […]
ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे. […]
आता तुम्ही म्हणाल की हे सारं सव्यापसव्य करणं वैज्ञानिकांना ठीक आहे हो. आम्ही कुठं असं संशोधन करायला जातो? किंवा आमची काय टाप आहे आईन्स्टाईन महाराजांची खोडी काढण्याची! शिवाय त्यांच्या विधानाबद्दल शंका घ्यायला आधी ते काय म्हणताहेत हे तर समजायला हव. तिथंच तर आमचं घोडं पेंड खातं. […]
ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत. […]
साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं. […]
आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो. […]
वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत. […]