चित्रपटांमध्ये तसंच टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आपण नेहमी पाहतो, गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड चाललेली असते. गुन्हेगाराला ज्यानं पाहिलं आहे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलावलेलं असतं. तो अतिशय घाबरून गेलेला असतो. त्यानं गुन्हेगाराला पाहिलं आहे हे त्याला माहिती असतं, पण गुन्हेगाराला त्याची कल्पना नसते. […]
ज्यांना आपण एकतर्फी आरसा मानतो त्यांना वैज्ञानिक भाषेत दुतर्फीच म्हटलं जातं. आपल्या नेहमीच्या आरशामध्ये काचेच्या एका बाजूला पार्यासारख्या परावर्तक पदार्थाचा जाड सलग थर दिलेला असतो. […]
सगळेच आरसे गुळगुळीत असले तरी सपाट असतीलच असं नाही. काही आरसे गोलाकार असतात. किरणांना आल्या दिशेनं परत पाठवणारे त्यांचे पृष्ठभाग एखाद्या गोलाच्या कापलेल्या भागासारखे असतात. […]
अंतर्वक्र आरशाच्या उलट बहिर्वक्र आरसे असतात. म्हणजे यांचा गोलाकार भाग बाहेरच्या दिशेनं वळलेला असतो. याही आरशांचा केंद्रबिंदू आणि फोकस असतात. मात्र ते आरशाच्या पुढं नसून पाठीमागच्या भागात असतात. म्हणून गणिती भाषेत या आरशांचा फोकस उणे असतो असं म्हटल जातं. […]
’सांग दर्पणा कशी मी दिसते?’ आजवर अनेक तरुणींनी भिंतीवरच्या किंवा हातातल्या आरशाला हा सवाल केला असेल. साजशृंगार करण्यासाठी स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही आरशाचा आधार लाभलेला आहे. […]
आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. […]
साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं. […]
उसाच्या रसापासून साखर तयार करतात तसा गूळ आणि काकवीही तयार केली जाते. गूळ उघड्यावर उकळलेला रस गाळण्यांमधून गाळून तयार केला जातो. उघड्यावर असल्यामुळं त्या रसावरचा हवेचा दाब जास्ती असतो. […]
आपण चव चाखतो ती ग्लुकोजची किंवा फ्रुक्टोजची. नुसत्याच लांबलचक माळेची चव आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच तर साखरेचा दाणा हा केवळ ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचाच बनलेला असतो आणि त्यात इतर कसलीही भेसळ नसते तेव्हाच आपल्याला ती चांगली गोड लागते. एरवी तिची गोड कमीच होण्याची शक्यता असते. […]
सर्व पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे अणू. सर्व सजीवांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. तसाच सर्व शर्करामय पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे मोनोसॅकराईड. हे दोन प्रकारचे असतात. पहिला ग्लुकोज. […]