नवीन लेखन...
Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ३ – सावरकरांचे धैर्य

सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २ – पुण्यात कपड्याची होळी

विदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १ – बालपणीचे सावरकर

आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच  जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा  केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून  क्रमिक लेखात  मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात  त्यांच्यासाठी  मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो. […]

गुरुदत्तची अजरामर कलाकृति-प्यासा

एक गाणे तर चक्क मोहमद रफीने कंपोज केले आहे. सचिनदा आले नव्हते, रफीने आधी नकार दिला होता. साहीर आला होता व ते रेकोर्ड झाले नसते तर रेकोर्डिंगचे पैसे वाया गेले असते, ते गाणे होते “तंग आ चुके है “ […]

सिनेमा बनताना -मेरा साया

१९६४ साली त्यांचा वोह कौन थी प्रदाशित झाला व तुफान चालला. म्हणून त्यांनी पुन्हा सस्पेन्स चित्रपट काढायचे ठरवले.त्यांना मराठी चित्रपट पाठलाग इतका आवडला होता कि त्यांनी त्याचे राईटस राजा परांजपे कडून विकत घेऊन मेरा साया काढायचे ठरवले. […]

सिनेमा बनताना – पडोसन

पडोसन २९ नोव्हेंबर १९६८ रोजी प्रदर्शित झाला.निर्माता होते मेहमूद आणि एन.सी. सिप्पी.मूळ बंगाली चित्रपट पाशेर बरी (१९५२) या चित्रपटाचा रिमेक होता. तेलगु मध्ये त्याचा दोनदा रिमेक झाला. पान्किती अमेयी या नावाने. […]

सिनेमा बनताना – मौसम

”मेरी  इश्क के लाखो  झटके “ गाण्याच्या वेळी काही स्टेप शर्मिला टागोरला येत नव्हत्या. त्यावेळी शेजारच्या सेटवर सरोजखान डान्स डायरेक्ट करत होत्या त्यांना गुलजारनी विनंती करून या गाण्याच्या स्टेप बसवायला सांगितल्या. […]

सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता. […]

सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल. […]

उत्कृष्ट अभिनेता -संजीव कुमार

संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे  व देहबोलीतून.नया दिन नई  रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा  संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..