नवीन लेखन...

सिनेमा बनताना – दो बिघा जमीन

दो बिघा जमीन हा चित्रपट 16 जानेवारी १९५३ला प्रदर्शित झाला. याच चित्रपटापासून बिमल रॉय प्रोडक्शन सुरु केले. बिमल रॉय यांनी बायसिकल थीफ हा चित्रपट बघितल्यावर प्रोडक्शन काढायचे ठरवले. व लोकांकडून कथा मागवल्या. त्यात एका लेखकाने आपली कथा रिक्षावाला हि कथा बिमलदाना दिली. त्यांना ती आवडली. पण या लेखकाने अट घातली कि चित्रपटाचे संगीतही मीच देणार. तो लेखक होता. सलील चौधरी. कास्टिंग साठी बलराज सहानीचे नाव सुचवले गेले त्यांना बोलावण्यात आले. गोरेपान सहानी सुटाबुटात आले. तेव्हा बिमलदा म्हणाले “ हा शंभू मोहतो या गरीब शेतकऱ्याचे काम करणार ?” पण शम्भूच्या गेट अप मध्ये बघितल्यावर त्यांचे नाव पक्के झाले. त्यांना सांगण्यात आले. कृश होण्यासाठी रोजचा आहार कमी करायचा. निरूप रॉय ला चोर बाजारातून साड्या आणून दिल्या व ताकीद दिली कि शुटींग संपेपर्यंत त्या धुवायच्या नाहीत. चित्रपटाचे नाव रवींद्रनाथ टागोर यांच्या दुई बिघो जमीन या शीर्षकावरून घेतले. बलराज सहानीना एक महिना कलकत्यात रिक्षा चालवायचे शिक्षण दिले. याच चित्रपटाच्या वेळी परिणीताच शुटींग चालू होते. त्यावेळी मीनाकुमारी सांगितले कि मला पण दो बिघा जमीन मध्ये काम करायचे आहे. पण कास्टिंग झाले होते. म्हणून तिच्यासाठी गेस्ट अपिरीयंस म्हणून एक लोरी देण्यात आली. मीनाकुमारीच्या ३३ वर्षाच्या कारकिर्दीतील एकमेव गेस्ट अपिरीयंस. निरूप रॉय भूमिकेने इतकी भरवली होती कि तिला दुखी: सीन मध्ये ग्लिसरीन वापरावे लागले नाही. चित्रपटाचा मूळ शेवट होता. शंभूला जमीन मिळते पण बायको मरते. बिमलदाना सवय होती कि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्या सहाय्यकांना थेटरात पाठवून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या. तेव्हा त्यांना कलकत्यात जाणवले कि लोकांना शेवट रुचला नाही म्हणून त्यांनी शेवट बदलला. शंभूची जमीन जाते, पण बायको जिवंत राहते. संपूर्ण चित्रपट नकारात्मक आहे. म्हणून त्यांनी ठरवले कि सगळी गाणी आशावादी, सकारात्मक दाखवायची.

१९५४ पासून फिल्म फेअर अवार्ड सुरु झाली. आणि पहिले अवार्ड दो बिघा जमिनला मिळाले. ७वे कान्स फेस्टीव्हल, कार्लोवी सोशल फिल्म अवार्ड अशी अनेक अवार्ड मिळाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिमिअरला राजकपूर व कृष्णाकपूर आले होते. चित्रपट पाहिल्यावर राजकपूर एकदम गप्प झाला. काही बोलेना. घरी आल्यावर कृष्णाकपूरने गप्प राहण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला “हाच तो चित्रपट आहे जो मला बनवायचा आहे” म्हणजे आवाराच्या  देश विदेशातील तुफान यशानंतरही त्याला या चित्रपटाबद्दल इतका आदर होता. हा चित्रपट म्हणजे आर्ट व व्यावसायिक चित्रपटाचा संगम म्हणून आजही मानले जाते.

— रवींद्र शरद वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..